युक्रेनच्या खासदाराची गोळ्या घालून हत्या
07:00 AM Dec 08, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मॉस्को : युक्रेनच्या संसदेचे सदस्य आणि रशियासमर्थक नेत्याची मॉस्कोमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही हत्या युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणेने घडवून आणल्याचा आरोप होत आहे. युक्रेनकडून देशद्रोही घोषित इलिया काइवा यांची मॉस्कोच्या ओडिंत्सोवो क्षेत्रातील एका उद्यानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. काइवा यांची हत्या युक्रेनियन एसबीयू सुरक्षा सेवेने घडवून आणल्याचा दावा केला जात आहे. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाकडून आक्रमण होण्यापूर्वी काइवा हे युक्रेनच्या संसदेचे सदस्य होते. परंतु युद्ध सुरू होण्यापूर्वीच काइवा यांनी रशियात पळ काढला होता. काइवा हे सातत्याने युक्रेनियन अधिकाऱ्यांवर टीका करत होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article