महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युक्रेनला मिळणार नाहीत दीर्घ पल्ल्याचे शस्त्रास्त्र

06:50 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिकेने फेटाळली अध्यक्ष झेलेंस्की यांची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/ बर्लिन

Advertisement

युक्रेनची दीर्घ पल्ल्यापर्यंत मारा करणाऱ्या शस्त्रास्त्रांची मागणी अमेरिकेने फेटाळली आहे. दीर्घ पल्ल्यापर्यंत मारा करणारी शस्त्रास्त्रs (क्षेपणास्त्रs आणि लढाऊ विमाने) युक्रेन युद्धाचे चित्र बदलण्यास यशस्वी ठरणार नाहीत. याचमुळे त्यांना युक्रेनला देण्याचा कुठलाच लाभ होणार नसल्याचे उद्गार अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी काढले आहेत.

यापूर्वी युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी रशियावर हल्ला करण्यासाठी दीर्घ पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांची मागणी केली होती. तर दुसरीकडे अमेरिकेने युक्रेनला 25 कोटी डॉलर्सची नवे शस्त्रास्त्रs देण्याची घोषणा केली आहे.

रशियाचा लाल रेषेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत सहकारी देशांनी आमच्या सैन्याला दीर्घ पल्ल्याची शस्त्रास्त्रs पुरविण्याची गरज आहे. या शस्त्रास्त्रांद्वारे युक्रेनचे सैन्य रशियाच्या अंतर्गत भागांमध्ये हल्ले करणार आहे. यामुळे रशियावर युद्ध संपविण्यासाठी दबाव येणार असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले होते. जर्मनीच्या रॅम्सटीन वायुतळावर अमेरिकेकडून युक्रेनच्या सहकारी देशांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीत झेलेंस्की यांनी भाग घेतला आहे.

युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क क्षेत्रातील सुमारे 1300 चौरस किलोमीटर भूभागारव कब्जा केला आहे. तर रशिया देखील पूर्व युक्रेनमध्ये सातत्याने पुढे सरकत आहे. सद्यकाळात रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण प्रोक्रोव्स्कच्या नजीक भीषण लढाई सुरू आहे.

बैठकीत जर्मनीने युक्रेनला 12 तोफा देण्याची तर कॅनडाकडून 80,840 रॉकेट्स देण्याची घोषणा केली आहे. या युद्धात रशियाचे साडेतीन लाख सैनिक मारले गेल्याची किंवा जखमी झाल्याचा आकडा अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी बैठकीत मांडला आहे. तर युक्रेन युद्धादरम्यान रशियाच्या 32 युद्धनौका नष्ट झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article