महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महामार्ग, बंदरनिर्मितीसाठी युक्रेनची भारताला साद

06:43 AM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मोदी सरकार घेणार मदतीचा निर्णय : रशियासोबतच्या युद्धाची पार्श्वभूमी

Advertisement

वृत्तसंस्था/ गांधीनगर

Advertisement

रशियाच्या भीषण हल्ल्यांना तोंड देणाऱ्या युक्रेनने भारताला मदतीचे आवाहन केले आहे. रशियाच्या हल्ल्यांमुळे देश उदध्वस्त झाला असून अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. अशास्थितीत भारताने पुनउ&भारणीत मदत करावी, जेणेकरून जागतिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देता येईल असे युक्रेनचे उपअर्थमंत्री वोलोदमयर कूजयो यांनी गुजरातमध्ये आयोजित संमेलनात म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला रुळावर परत आणण्याची योजना सादर केली आहे.

युक्रेनच्या पुनउ&भारणीमुळे जगातील अन्य देशांचाही लाभ होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. युक्रेनच्या मंत्र्याला गुजरातमध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाला भारतीय विदेश धोरणातील बदलाचा संकेत मानले जात आहे. यापूर्वी भारताने रशियाच्या हल्ल्याची निंदा करण्यास नकार दिला होता. यामुळे युक्रेनच्या सरकारने नाराजी व्यक्त केली होती.

युद्धाच्या आव्हानानंतरही आमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेत अद्याप तेजी असल्याचा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करत असताना युक्रेनने मदतीसाठी साद घातली आहे. भारत आणि रशिया यांच्यात पारंपरिक स्वरुपात अत्यंत मजबूत संबंध आहेत. भारत कच्च्या तेलासोबत रशियाकडून शस्त्रास्त्रs तसेच आण्विक तंत्रज्ञान प्राप्त करतो. भारताने महामार्ग, सागरी आणि नदीवरील बंदरनिर्मिती तसेच रेल्वेमार्ग, साठवणूक केंद्र तसेच वितरणाच्या क्षेत्रात गुंतवणूक करावी अशी युक्रेन सरकारची इच्छा आहे.

युक्रेनच्या हजारो चौरस किलोमीटर भागात पेरण्यात आलेले भूसुरुंग हटविण्यास भारताने मदत करावी अशी इच्छा झेलेंस्की सरकारने व्यक्त केली आहे. युक्रेनच्या या मागणीवर भारताने अद्याप कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. भूराजकीय स्थिती आणि प्रकल्पांसाठीचा खर्च पाहून भारत युक्रेनच्या मागणीवर विचार करणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article