युक्रेनने रशियावर डागली ब्रिटिश क्षेपणास्त्रे
कुर्स्कमध्ये अनेक विस्फोट, अमेरिकन क्षेपणास्त्रांचाही वापर
वृत्तसंस्था/कीव्ह
युक्रेनकडून रशियावर ब्रिटिश क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनने रशियावर पहिल्यांदाच ब्रिटिश क्षेपणास्त्र स्टॉर्म शॅडो क्रूजने हल्ला केला आहे. कमीतकमी 12 क्षेपणास्त्रs कुर्स्क भागात डागण्यात आल्याचा दावा रशियाच्या सैन्याने केला आहे. यापूर्वी युक्रेनने मंगळवारी अमेरिकेकडून प्राप्त दीर्घ पल्ल्याचे एटीएसीएमएस बॅलेस्टिक क्षेपणास्त्र रशियाच्या दिशेने डागले होते. तर नाटो देशांच्या शस्त्रास्त्रांचा वापर आमच्या भूमीवर झाल्यास आम्ही याला तिसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ मानू अशी धमकी रशियाने दिली होती. युक्रेनने मंगळवारी सकाळी ब्रियांस्क भागात दीर्घ पल्ल्याची 6 आर्मी टॅक्टिकल क्षेपणास्त्रs डागली होती. यातील 5 क्षेपणास्त्र नष्ट केल्याचा दावा रशियाने केला होता.
भूसुरुंग पुरविणार अमेरिका
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनला अँटी पर्सनल लँड माइन्स देण्याची तयारी दर्शविली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने याची पुष्टी दिली आहे. लवकरच युक्रेनला भूसुरुंग पुरविण्यात येणार आहेत. अमेरिकेने या भुसुरुंगांचा वापर युक्रेनच्या भूभागातच करण्याची अटक घातली आहे. रशियन सैन्य युक्रेनच्या पूर्व भागाने वेगाने पुढे सरकत आहे. रशियाच्या सैन्याला रोखण्यासाठी अमेरिकेने युक्रेनला हे शस्त्र देण्याचा निर्णय घेतला आहे.
3 देशांकडून अलर्ट जारी
रशिया-युक्रेन यांच्यातील तणाव वाढल्यावर 3 नॉर्डिक देशांनी युद्ध अलर्ट जारी केला. नॉर्वे, फिनलंड आणि डेन्मार्कने नागरिकांना आवश्यक सामग्रीचा साठा करणे आणि स्वत:च्या सैनिकांना युद्धासाठी तयार राहण्याचा निर्देश दिला आहे. या देशांच्या सीमा रशियाला लागून आहेत. युक्रेनवर आण्विक हल्ला झाल्यास या देशांवरही प्रभाव पडू शकतो. नॉर्वेने स्वत:च्या नागरिकांना युद्धावरून सतर्क केले आहे. स्वीडनने स्वत:च्या नागरिकांना युद्धादरम्यान किरणोत्सर्गापासून वाचण्यासाठी आयोडिनच्या गोळ्या ठेवण्याची सूचना केली आहे.