महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

युक्रेनची पिछाडीवरून मुसंडी मारत स्लोव्हाकियावर 2-1 ने मात

06:31 AM Jun 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ ड्युसेलडॉर्फ (जर्मनी)

Advertisement

यंदाच्या चार सामन्यांतील युक्रेनचा पुनरागमन करणारा तिसरा विजय शुक्रवारी नोंदला गेल्याने युरोपियन चषक फुटबॉल स्पर्धेतील त्यांचे आव्हान कायम राहिले आहे. रोमन येरेमचुकच्या गोलाच्या जोरावर त्यांनी स्लोव्हाकियावर 2-1 असा विजय मिळवला.

Advertisement

युरो 2024 पर्यंत पोहोचताना मार्चमध्ये प्लेऑफमध्ये 2-1 फरकाने युक्रेनने दोन विजय मिळविले होते. स्लोव्हाकियाला त्याच गोलफरकाने पराभूत केल्याने संघाच्या मोहिमेचे पुनऊज्जीवन झाले आहे. सोमवारी रोमानियाकडून 3-0 ने पराभूत झाल्यानंतर युक्रेनला आणखी एका पराभव स्वीकारावा लागल्यास ते बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आले असते.

ड्युसेलडॉर्फमधील पावसाने खराब झालेल्या मैदानावर आयोजित केलेला हा सामना विशेषत: युक्रेनच्या कौशल्याचे प्रदर्शन घडविणारा राहिला. 17 व्या मिनिटाला स्लोव्हाकियाच्या इव्हान श्रांझच्या गोलमुळे युक्रेन पिछाडीवर पडला होता. मात्र युक्रेनने पहिल्या सत्रात क्षीण राहिल्यानंतर प्रशंसनीय चिकाटीने प्रत्युत्तर देत 54 व्या मिनिटाला मायकोला शापारेन्कोच्या माध्यमातून बरोबरी साधली. मात्र बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या रोमन येरेमचुकने सामन्याच्या अखेरीस निर्णायक गोल करत युक्रेनसाठी हिरोची भूमिका बजावली. त्याने शापारेन्कोच्या पासचे भांडवल केले आणि सदर गोलाची नोंद केली.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article