For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘युजीसी-नेट’ जून 2024 ची परीक्षा रद्द

06:22 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘युजीसी नेट’ जून 2024 ची परीक्षा रद्द
Advertisement

परीक्षेतील अनियमिततेच्या तक्रारीनंतर ‘एनटीए’चा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) देशातील विविध शहरांमध्ये 18 जून 2024 रोजी घेतलेली युजीसी-नेट जून 2024 ची परीक्षा रद्द केली आहे. परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने युजीसी-नीट जून 2024 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता परीक्षा नव्याने घेतली जाईल, त्यासाठीची माहिती स्वतंत्रपणे शेअर केली जाईल. तसेच हे प्रकरण सखोल तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे.

Advertisement

एनटीएने एकाच दिवसात सर्व 83 विषयांसाठी परीक्षा घेतली होती. त्यानंतर 19 जून 2024 रोजी, विद्यापीठ अनुदान आयोगाला (युजीसी) गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरच्या नॅशनल सायबर क्राइम थ्रेट अॅनालिसिस युनिटकडून परीक्षेसंदर्भात काही इनपुट मिळाले. मंगळवारी झालेल्या परीक्षेत अनियमितता झाल्याचे या इनपुट्सवरून प्रथमदर्शनी दिसून आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा बुधवारी रात्री करण्यात आली.

एनटीएने दोन शिफ्टमध्ये ओएमआर (पेन आणि पेपर) पद्धतीने परीक्षा घेतली होती. ही परीक्षा देशभरातील 317 शहरांमधील 1,205 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. त्यामध्ये एकूण 11 लाख 21 हजार 225 परीक्षार्थी सहभागी झाले होते. 18 जून रोजी झालेल्या नेट परीक्षेची पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते 12.30 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते 6 अशी होती.

Advertisement
Tags :

.