For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वर्षातून दोनदा होणार सीबीएसई बोर्ड परीक्षा

11:35 PM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
वर्षातून दोनदा होणार सीबीएसई बोर्ड परीक्षा
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सीबीएसई बोर्डाद्वारे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या योजनेवर सहमती झाली आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाची ही परीक्षा जानेवारी आणि एप्रिलमध्ये होणार आहे. केंद्राकडून पुढील सत्र 2025-26 पासून ‘सीबीएसई’मध्ये नवीन पॅटर्न लागू करण्याची तयारी सुरू आहे. नवीन पॅटर्नची पहिली बोर्ड परीक्षा जानेवारी 2026 मध्ये आणि त्याच सत्राची दुसरी परीक्षा एप्रिल 2026 मध्ये होईल.

विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांमध्ये बसण्याचा पर्याय असेल. विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास ते त्यांच्या सोयीनुसार दोन्ही किंवा कोणत्याही एका परीक्षेला बसू शकतील. दोन्ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या कामगिरीसाठी निकालाचा उपयोग करता येईल. मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाने देशभरातील 10 हजारांहून अधिक शाळांच्या मुख्याध्यापकांशी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष बैठकीमध्ये याबाबत मते जाणून घेतली. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेसाठी शिक्षण मंत्रालयाने तीन पर्याय दिले होते. या पर्यायांपैकी देशातील 10 हजारांहून अधिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी तिसरा पर्याय निवडला आहे. या अंतर्गत जेईई मेन परीक्षेप्रमाणेच बोर्डाच्या परीक्षा दोन सत्रात घेण्यात याव्यात आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होण्याची परवानगी देण्यात यावी, यावर एकमत झाले.

Advertisement

शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सत्र 2025-26 मधील बोर्डाच्या परीक्षा जुन्या अभ्यासक्रमाच्या आधारे घेतल्या जातील. नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके येण्यास 2 वर्षे लागतील. नवीन पुस्तके आल्यानंतर इयत्ता 8 वी, 10 वी आणि 12 वी साठी नवीन पुस्तके सत्र 2026-27 पासून उपलब्ध होतील.

Advertisement
Tags :

.