महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विदेशी विद्यापीठांसंबंधी युजीसीचा अलर्ट

06:10 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अॅडटेक कंपन्यांनाही दिला इशारा : संबंधित पदव्यांना मान्यता नसणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

विदेशी विद्यापीठांकडून दुहेरी पदवी, संयुक्त पदवी किंवा ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमाता प्रवेश घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) स्वत:ची मान्यताप्राप्त नसलेल्या विदेशी विद्यापीठांच्या पदवींना मान्यता देणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच युजीसीने विदेशी विद्यापीठांसोबत मिळून अभ्यासक्रम करविणाऱ्या अॅडटेक कंपन्या आणि महाविद्यालयांनाही इशारा दिला आहे. यातील कुठलीच पदवी वैध ठरणार नाही,  असे म्हणत युजीसीने विद्यार्थ्यांना अशाप्रकारच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश न घेण्याची सूचना केली आहे.

युजीसीकडून मान्यता नसताही अनेक उच्चशिक्षण संस्था आणि महाविद्यालयांनी विदेशी आधारित शैक्षणिक संस्था किंवा प्रदात्यांसोबत करार करत विद्यार्थ्यांना विदेशी पदवी देत असल्याचे आढळून आले आहे. अशाप्रकारची कुठलीही भागीदारी किंवा व्यवस्थेला युजीसीची मान्यता नाही. तसेच संबंधित पदवी देखील अमान्य असल्याचे युजीसी सचिव मनीष जोशी यांनी म्हटले आहे. काही अॅडटेक कंपन्या सर्वच माध्यमांमध्ये जाहिराती देत काही विदेशी विद्यापीठे आणि संस्थांसोबत मिळून

ऑनलाइन स्वरुपात पदवी आणि डिप्लोमा अभ्यासक्रम सादर करत असल्याचा दावा करत आहेत. परंतु अशाप्रकारच्या फ्रेंचाइजी अरेंजमेट्सना (व्यवस्था) परवानगी नाही तसेच अशा कुठल्याही कार्यक्रम किंवा पदवीला युजीसीची मान्यता नसेल असे जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

सल्ला अन् इशारा

युजीसीने नियमांचे पालन न करणाऱ्या डिफॉल्ट कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. तर विद्यार्थी आणि जनतेला सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. युजीसीची मान्यता नसलेले अभ्यासक्रम, कार्यक्रम आणि पदव्यांच्या आमिषांना बळी पडू नका असे युजीसीने म्हटले आहे. कुठलीही विदेशी उच्च शिक्षण संस्था युजीसीच्या मंजुरीशिवाय भारतात कुठलाही अभ्यासक्रम राबवू शकत नाही.

विदेशी कंपन्यांना भारतात स्वत:चे

कॅम्पस स्थापन करण्याची अनुमती देण्यात आली असली तरीही याकरता युजीसीची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठांचा अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article