महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उडुपीचा विघ्नेश ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’

10:43 AM Dec 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उडपीचा चरणराज उपविजेता, बेळगावचा मंजुनाथ कोल्हापुरे उकृष्ठ पोझर 

Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व गोकाक तालुका शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 11 वी सतीश शुगर क्लासीक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत उडपीच्या विघ्नेश आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. सतीश शुगर क्लासीक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा मानाचा किताब पटकविला. उडपीच्या चरणराजला उपविजेतेपदावरती समाधान मानावे लागले. बेळगावच्या मंजुनाथ कोल्हापुरेने उकृष्ठ पोझरचा बहुमान मिळविला. चिकोडी येथील आरडी हायस्कूलच्या मैदानावरती आयोजित या स्पर्धा आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार 7 वजनी गटात झाली. स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. निकाल पुढील प्रमाणे...

Advertisement

त्यानंतर मिस्टर सतीश क्लासीक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताबासाठी संदेशकुमार, शशिधर नाईक, धिरजकुमार, विघ्नेश, वरुणकुमार जीवीके, प्रशांत खन्नुकर व चरणराज यांच्यात लढत झाली. त्यामध्ये चरणराज व विघ्नेश यांच्यात  तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये उडपीच्या विघ्नेशने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर सतीश शुगर क्लासीक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा माताचा किताब पटकाविला. तर उडपीच्या चरणराजने उपविजेतेपद पटकाविले. उत्कृष्ठ पोझरच्या लढतीत बेळगावच्या मंजुनाथ कोल्हापुरेने आपल्या उत्कृष्ठ पोझींगव्दारे उत्कृष्ठ पोझरचा मानाचा किताब पटकाविला.

महावीर मोहीते, प्रभाकर कोरे, शिवा पाटील, मांजरेकर, किरण रजपूत, रियाज चौगुले, अर्जुन नाईकवाडी, अजित सिद्दन्नावर, सुनील आपटेकर, नागराज कोलकार, आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या, विघ्नेशला 1 लाख 50 हजार रुपये रोख, आकर्षक चषक, मानाचा किताब, प्रमाणपत्र व भेटवस्तु तर उपविजेत्या चरणराजला 60 हजार रुपये रोख, चषक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. उत्कृष्ठ पोझर मंजुनाथ कोल्हापुरेला 10 हजार रुपये रोख व चषक देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्दन्नावर, जय निलकंठ, जे. डी. भट्ट, गंगाधर एम., हेमंत हावळ, रमेश कळ्ळीमनी, काटेश बोकावी, सुनील पवार, सुनील राऊत, अनंत लंगरकांडे, प्रितेश कावळे, सचिन मोहीते, नूर मुल्ला, आश्विन निंगन्नावर, शेखर जाणवेकर, आकाश हुलीयार, आसीफ कुशगल, शंकर पिल्ली, सलीम गावकर, कृष्ण चिक्कतुंबल यांनी काम पाहिले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article