For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डबल गद्दार हा कलंक ते पुसू शकत नाहीत

04:23 PM Feb 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
डबल गद्दार हा कलंक ते पुसू शकत नाहीत
Advertisement

उद्धव ठाकरेंचा मंत्री केसरकरांना टोला

Advertisement

सावंतवाडी -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सावंतवाडी दौऱ्यावर आले होते. सावंतवाडी गांधी चौक येथे झालेल्या सभेत त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना जोरदार टोला लगावला. ते म्हणाले केसरकर यांच्या कपाळावर जो गद्दारीचा शिक्का लागलाय तो आयुष्यभर जाणार नाही. शिवसेनेत ते आले होते तेव्हा मी त्यांना मोठ्या अपेक्षेने पक्षात घेतले होते. केसरकर हे साईबाबांचे भक्त आहेत. वाटलं होतं श्रद्धाळू असतील आणि त्यांच्याकडे सबुरीही असेल, परंतु त्यांची ना कोणत्या पक्षावर श्रद्धा आहे ना पक्षात थांबण्याची त्यांना सबुरी आहे. त्यावेळी मी त्यांना मंत्री केले, पण गद्दारी ही त्यांच्या नसानसात भिनली आहे. त्यामुळे डबल गद्दार हा कलंक ते पुसू शकत नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातील घाण साफ करायची आहे असा टोला ठाकरेंनी केसरकर यांना लगावला.

Advertisement

Advertisement
Tags :

.