उद्धव ठाकरेंचा चेहरा वापरला गेला...ते आता हिंदुत्ववादी राहीले नाहीत- चंद्रकांत पाटील
मी कधीही आरएसएसवर टिका केलेली नाही. आरएसएस हे माझे आईवडिल असून त्यांच्यावर रागावण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच येणारी विधासभा निव़डणूक आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नर्तृत्वाखालीच लढवणार असून त्यामध्ये आम्हाला चांगले यश मिळेल असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
कोल्हापूर दौऱ्यावर असलेले भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भाजप कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य का कमी पडलं तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कशा प्रकारचे नियोजन करण्यात येईल याचाही आढावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
विधानसभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेर्तृत्वाखालीच...
आजच्या बैठकीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरातील विधानसभेच्या नियोजनाचा आढावा घेतला. माध्यमांनी विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला विचारला असता त्यांनी आपण महायुती म्हणूनच जनतेसमोर जाणार असल्याचं सांगितलं. तसेच येणाऱी विधानसभा निवडणुक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेर्तृत्वाखालीच लढणार असल्याचं त्यांनी अधोरेखित केले.
उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी राहीले नाहीत...
या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची पीछेहाट झालेली आहे. ते आता हिंदुत्ववादी राहीले नाहीत. उद्धव ठाकरे यांचा चेहरा फक्त वापरण्यात आला. आणि बाकिचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर अंधारात राहीली असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या सह त्यांच्या मित्र पक्षावर केला.
जयंत पाटील संपर्कात नाहीत...
जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्या समोर य़ेत असताना चंद्रकांत पाटलांनी याचं खंडण केलं आहे. जयंत पाटील हे कोणाच्याही संपर्कात नसून वरिष्ठ पातळीवर जर तस काही असेल तर मला माहीत नाही. असं स्पष्टीकरण ही त्यांनी दिलं आहे.