उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट
04:43 PM Dec 17, 2024 IST | Pooja Marathe
Advertisement
नागपूर
नागपूरमध्ये राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केले.
यावेळी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे आमदार अनिल परब, आमदार भास्कर जाधव, आमदार सचिन अहिर, आमदार संजय पोतनीस, आमदार वरूण सरदेसाई उपस्थित होते.
Advertisement
Advertisement