For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

तिकडे शेपुट घालणारे...इकडे येऊन फणा काढतात; उद्धव ठाकरे यांचा अमित शहांवर हल्लाबोल

04:22 PM Mar 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
तिकडे शेपुट घालणारे   इकडे येऊन फणा काढतात  उद्धव ठाकरे यांचा अमित शहांवर हल्लाबोल
Uddhav Thackeray attacks Amit Shah

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी महाविकास आघाडी ही पंक्चर झालेली रिक्षा असल्याचं म्हटलयं. पण मणिपूर पेटले असताना त्यांची तिकडे जाण्याची हिंमत नाही. ते मणिपूरमध्ये शेपूट घालतात आणि महाराष्ट्रात येऊन फणा काढतात अशी जोरदार टिका शिवसेना- उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे.

Advertisement

देशाचे गृहमंत्रीा आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा हे दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. पुणे येथिल जाहीर सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही पंक्चर रिक्षा असल्याचा हल्लाबोल केला होता. तसेच, महाविकास आघाडीतील नेत्यांना आपल्या परिवाराची काळजी असून त्यांचं राजकारणही त्यासाठीच चालल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, "इतर पक्षाप्रमाणे आमचे आमदार- खासदार फोडले की, शिवसेना संपेल, असं भाजपाला वाटलं असेल. पण शिवसेना तशी संपणार नाही. शिवसेना भाजपाला गाडून, मूठमाती देऊन पुढे जाईल. पण शिवसेना कधीच संपणार नाही.” असा घणाघात त्यांनी केला.

Advertisement

पुढे बोलताना ते म्हणले, "जम्मू- काश्मीरमध्ये जायची त्यांची हिंमत नाही, तिथे शेपूट घालतात. अरुणाचल प्रदेशमध्ये चीनची घुसखोरी सुरू आहे, तिथेही शेपूट घालतात आणि असे शेपूट घालणारे गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावर फणा काढून गेले. महाराष्ट्रात येऊन त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. मविआ म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे, असे ते म्हणाले. आमची रिक्षा पंक्चर झाली असेल कारण ती साध्या माणसाची रिक्षा आहे. पण तुमचे ट्रिपल इंजिनच्या सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लागली आहेत त्याचं काय ?” असा सवाल त्यांनी अमित शहा यांना विचारला.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.