For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

अनेक वर्षानंतर उदयनराजे आणि अजित पवार एकत्र !

02:54 PM Jan 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
अनेक वर्षानंतर उदयनराजे आणि अजित पवार एकत्र
Udayanraje and Ajit Pawar

पुणे विभागीय राज्यस्तरीय नियोजन बैठकीत एकत्र

Advertisement

पुणे विभागाची राज्यस्तरीय नियोजन बैठक आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी सातारा जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या आर्थिक तरतुदी बाबत चर्चा झाली. त्या मध्ये प्रामुख्याने प्रतापगड किल्ला संवर्धन, क वर्ग पर्यटन स्थळे, ग्रामीण तसेच शहरी भागात विकसित करण्यात येणारे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच स्मार्ट प्राथमिक शाळा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद, बांबू लागवडीसाठी आर्थिक तरतूद, शासकीय कार्यालयाची डागडुजी, अंगणवाडी बांधकाम, महिला बाल विकास भवन बांधकाम, वॉटर स्पोर्ट्स विकसित करण्यासाठी या संबंधी चर्चा झाली. पर्यटन आराखडा तयार करून जास्तीत जास्त निधी सातारा जिल्ह्याला मिळावा अशी विनंती केली असता जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न करू असे मंत्री महोदय यांनी सांगितले.

या वेळी आमदार श्री मकरंद पाटील, आमदार श्री दीपक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री अतुल चव्हाण, जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ज्ञानेश्वर खिल्लारी, जिल्हा नियोजन अधिकारी श्री शशिकांत माळी, विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थितीत होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
×

.