For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उदयनिधी यांना पदोन्नती नाही

06:39 AM Jan 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
उदयनिधी यांना पदोन्नती नाही
Advertisement

वृत्तसंस्था / चेन्नई 

Advertisement

तामिळनाडूचे क्रिडा आणि युवक कल्याण मंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांचे पुत्र उदयनिधी यांना पदोन्नती देण्यात येण्याच्या वृत्ताचा स्टॅलिन यांनी इन्कार केला आहे. काही प्रसारमाध्यमांनी अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध केले असून ती केवळ अफवा आहे, अशी टिप्पणी त्यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.

सत्ताधारी द्रमुक पक्षाच्या युवा आघाडीचे अधिवेशन सध्या येथे होत आहे. या अधिवेशनाचे महत्व कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा काही वृत्तपत्रे आणि सोशल मिडियावरुन प्रसारित केल्या जात आहेत. तथापि, आपल्या मंत्रिमंडळात कोणत्याही प्रकारचा तणाव किंवा अंतर्गत संघर्ष नसून सरकार पूर्णत: स्थिर आहे. अशा स्थितीत उदयनिधी यांना पदोन्नती देण्याचा प्रश्न येत नाही. आपल्यासह सर्व मंत्री हे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नेतृत्वात काम करीत आहेत, असे उदयनिधी यांनीही स्पष्ट केल्याने या अफवांमधील जोर संपला आहे, अशी टिप्पणी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केली. तसेच आपण आजारी असल्याचे वृत्तही त्यांनी ठामपणे फेटाळले. आपल्या प्रकृतीविषयीची वृत्तेही खोडसाळपणाची असून आपण ठणठणीत आहोत आणि जोमाने कार्यरत आहोत, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.

Advertisement

Advertisement

.