For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहा नव्या ‘वंदे भारत’ना हिरवा झेंडा

06:56 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
सहा नव्या ‘वंदे भारत’ना हिरवा झेंडा
Advertisement

पंतप्रधानांच्या हस्ते झारखंडमधून उद्घाटन : उत्तर प्रदेश, बिहारसह पाच राज्यांना फायदा

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सहा नवीन वंदे भारत टेनला हिरवा झेंडा दाखवला. झारखंड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशसाठी त्यांनी डिजिटल माध्यमातून वंदे भारत रेल्वे सुरू केल्या. यावेळी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, अन्नपूर्णा देवी आणि संजय सेठ यांच्याशिवाय झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार हे टाटानगर स्टेशनवर उपस्थित होते.

Advertisement

वंदे भारत पोर्टफोलिओ सतत विस्तारत आहे. चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी त्यात नवीन गाड्या समाविष्ट केल्या जात आहेत. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत स्वदेशी बनावटीची ही टेन लाखो प्रवाशांना लक्झरी आणि अत्याधुनिक सुविधा पुरवते. झारखंडसारख्या तुलनात्मकदृष्ट्या मागास असलेल्या राज्यात अशाप्रकारच्या उत्तम सेवा पुरवून केंद्र सरकारने राज्यातील जनतेची मोठी सोय केल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी केला.

नव्याने सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत रेल्वेंमुळे कनेक्टिव्हिटी, सुरक्षित प्रवास आणि प्रवाशांसाठी सुविधा वाढतील. या नव्या गाड्या सुरू झाल्यानंतर आतापर्यंतच्या एकूण वंदे भारत रेल्वेंची संख्या 54 वरून 60 झाली आहे. या रेल्वेंच्या माध्यमातून वंदे भारत टेन सध्या दररोज 120 ट्रिपद्वारे 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 280 हून अधिक जिल्ह्यातील प्रवाशांना आरामदायी आणि सुपरफास्ट रेल्वे प्रवासाचा आनंद देत आहेत. 15 फेब्रुवारी 2019 रोजी पहिली वंदे भारत रेल्वे सुरू झाली. या गाड्यांची क्षमता ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्याची आहे.

या मार्गांवर गाड्या धावणार

टाटानगर-पाटणा, ब्रह्मपूर-टाटानगर, राउरकेला-हावडा, देवघर-वाराणसी, भागलपूर-हावडा आणि गया-हावडा या सहा नवीन मार्गांवर वंदे भारत रेल्वे समाविष्ट करण्यात आल्या आहेत. म्हणजेच आजच्या या सहा वंदे भारत टेनमुळे बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे.

आतापर्यंत 3.17 कोटींहून अधिक प्रवाशांना लाभ

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, वंदे भारतने 14 सप्टेंबर 2024 पर्यंत 54 गाड्यांच्या ताफ्यासह (अप-डाउनसह 108 ट्रिप) एकूण 36,000 फेऱ्या पूर्ण केल्या आहेत आणि 3.17 कोटींहून अधिक प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवले आहे. मूळ वंदे भारत टेन संच आता वंदे भारत 2.0 मध्ये रुपांतरित झाली असून त्यात वेगवान स्पीड, आर्मर, अँटी-व्हायरस सिस्टम आणि वायफाय यांसारखी प्रगत वैशिष्ट्योही समाविष्ट आहेत.

Advertisement

.