For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्र सरकारच्या सौरउर्जा योजनेसाठी तालुक्यातून उचगावची निवड

10:52 AM Aug 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
केंद्र सरकारच्या सौरउर्जा योजनेसाठी तालुक्यातून उचगावची निवड
Advertisement

हेस्कॉमकडून मार्गदर्शन शिबिर : योजनेचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

Advertisement

वार्ताहर/उचगाव

केंद्र सरकारने सौरऊर्जेला प्राधान्य देण्यासाठी मॉडेल सौरग्राम ही योजना अमलात आणली आहे. बेळगाव तालुक्यातील उचगाव गावाची यासाठी निवड करण्यात आली आहे. या सौरऊर्जे संदर्भात जनजागरण करण्यासाठी म्हणून हेस्कॉम खात्याच्या वतीने सोमवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समुदाय भवन येथे गावातील नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सौरऊर्जा संदर्भात माहिती देण्यात आली आणि गावातील नागरिकांनी अधिकाधिक सोलार घेऊन केंद्र सरकारच्या एक कोटी रुपयांच्या बक्षिसाचे मानकरी व्हा, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे होत्या. या कार्यक्रमाला कार्यनिर्वाहक अभियंता ग्रामीण विभागचे विनोद केरूर, ग्रा. पं. उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, सदस्य एल. डी. चौगुले, गजानन नाईक व योजनेचे प्रथम मानकरी म्हणून बाळू खाचो कदम व महेश कुंडलकर, पीडीओ शिवाजी मडिवाळ उपस्थित होते.

Advertisement

यावेळी टाटा सोलरचे व्हेंडर विजय बोरकर माहिती देताना म्हणाले, सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेनंतर आता मॉडेल सौरग्राम ही योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी उचगाव गावाची निवड करण्यात आली असून यामध्ये सोलार कनेक्शनचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेऊन विकास साधावयाचा आहे. सौर ऊर्जेचा वापर केल्यानंतर नागरिकांना कोणत्या प्रकारचे फायदे होतात. सौरऊर्जेचा आपण कसा वापर केला पाहिजेत, ही योजना कशी आपणाला लाभदायी ठरते, या संदर्भात छगनमट्टी येथील सरकारी प्राथमिक कन्नड शाळा तसेच उचगाव येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेतील मुला-मुलींनी पथनाट्या सादर केले. कुसुम बी ही योजना शेतकरी वर्गासाठी आयोजित केलेली आहे. याचाही सर्वांनी लाभ घ्यावा, असे यावेळी हेस्कॉम खात्याच्या वतीने आवाहन करण्यात आले. हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता दीपक धनपाल यांनी स्वागत केले. तर उचगाव सेक्शन ऑफिसर सचिन यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.