उचगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा : सनराईज शुटर्स संघ विजेता
10:27 AM Nov 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
उचगाव : उचगाव येथील वैकुंठधाम येथे झालेल्या उचगाव प्रीमियर लीग पर्व दुसरे क्रिकेट स्पर्धेत सनराईज शुटर्सने मराठा स्पोर्टसचा 6 धावांनी पराभव करून प्रिमीयर चषक पटकाविला. अंतिम सामन्यात सनराज शूटर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 55 धावा केल्या. त्यानंतर मराठा स्पोर्ट्सने 8 षटकात 48 धावा केल्या. हा सामना सनराजसने 6 धावांनी जिंकला. त्यात सुरजने नाबाद 29 धावा केल्या. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी जावेद जमादार, किसन लाळगे, विकास पाटील, गजानन बांदिवडेकर, बसवंत चौगुले, संदेश नलवडे, यल्लाप्पा पावशे या सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघाना रोक रकमेची बक्षिसे व चषक देण्यात आले.
Advertisement
Advertisement