महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दत्ता कांबळीला यूसीसी मुरगाव तालुका बुद्धिबळचे जेतेपद

12:14 PM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : बेलाबाय वास्कोतील युनायटेड स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबने आयोजित केलेल्या एक दिवशीय रॅपीड बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद दत्ता कांबळीने मिळविले.मुरगाव तालुका बुद्धिबळ संघटना व बायणाच्या सेंटीनरी चेस क्लबच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन मुरगाव तालुका पातळीवर करण्यात आले होते.स्पर्धेत उपविजेतेपद डॉ. ब्रँडन पिरोझने तर तिसरे स्थान यश पॉल याने मिळविले. त्यानंतरचे चौथे ते दहावे स्थान अनुक्रमे ऋषिकेश परब, रिशीत गावस, संजील होबळे, वालांका फर्नांडिस, अथर्व शिरोडकर, राजवीर पाटील व श्लोक मेस्ता यांना मिळाली.

Advertisement

7 वर्षाखालील वयोगटात आरव नागेशकर व श्रीशा घाडी, 9 वर्षाखालील गटात श्रेष्ठ घोणसेकर व सुर्वी केळोस्कर, 11 वर्षाखालील गटात विपुल कदम व आर्ना सावंत, 13 वर्षाखालील गटात इर्वीन आल्बुकर्क व लावण्या नाईक तर उत्कृष्ट वॅटरन व उत्कृष्ट महिला खेळाडूचे पुरस्कार अनुक्रम भिमाप्पा हरीजन व नियती गाड यांना प्राप्त झाले. बक्षिसवितरण वास्कोचे आमदार दाजी साळकर यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे उद्घाटन मुरगाव तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष किशोर बांदेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी  क्लबचे अध्यक्ष सुदीप धारगळकर, एमटीसीएचे सचिव मुकूंद कांबळी, खजिनदार पुंडलीक नायक तसेच महादेव पार्सेकर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article