For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Politics : उबाठा सेनेचे सय्यद, जयंतराव समर्थक पाटील राष्ट्रवादीत !

05:23 PM Nov 12, 2025 IST | NEETA POTDAR
sangli politics   उबाठा सेनेचे सय्यद  जयंतराव समर्थक पाटील राष्ट्रवादीत
Advertisement

                         हिरकणी फाउंडेशनच्या प्रतिभाताई पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Advertisement

ईश्वरपूर :उबाठा शिवसेनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष, माजी नगरसेवक शकील सय्यद व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हा महिला कार्यकारिणी सदस्या व हिरकणी फौंडेशच्या संस्थापक अध्यक्ष प्रतिभाताई पाटील व बूथ अध्यक्ष धनंजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा विजया सांस्कृतिक हॉलमध्ये झाला.

वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केदार पाटील व एन.डी. शुगरचे चेअरमन दत्ताजीराव पाटील यांच्या सहकार्यातून जिल्हाअध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी महायुतीचे नेते जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, अँड चिमण डांगे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, विश्वनाथ डांगे, यांची प्रमुख उपस्थिती होती

Advertisement

यावेळी निशिकांत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सगळ्याचा सन्मान राखला जाईल. कार्यकृत्याला न्याय देणेचे काम पक्ष नेहमी करत आला आहे.  नगरपालिका निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे.

राहुल महाडीक म्हणाले, अनुभवी असे कार्यकर्त्याचे पक्ष प्रवेश झाले आहेत. महायुतीला याचा फायदा होईल. अजून काही प्रवेश होणार
आहेत. केदार पाटील म्हणाले, प्रभाग २ व ३ मधील मातबर कार्यकर्त्याचा प्रवेश झाला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्याला बळ देणेचे काम निश्चितच पक्ष करेल. येत्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा नगरपालिकेवर फडकवूया.

शोक खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दादासाहेब पाटील यांनी आभार मानले. यावेळी सागर खोत, विश्वनाथ डांगे, विजय पवार, शिवाजी पवार, वीरेंद्र राजमाने, सागर मालगुंडे, तैसीन आतार, आरती खोत, भाग्यश्री माने, प्रतिभा शिंदे, सुजित थोरात, सचिन पाटील, संजय पाटील, बापुसो पाटील, सचिन वाडेकर, अजित पाटील, प्रमोद खुडे, चित्रा सुर्यगंध, वैयजता ढवळे, नीता पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.