For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यू-20 विश्व अॅथलेटिक्स : 43 सदस्यीय भारतीय तुकडीचा सहभाग

06:15 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
यू 20 विश्व अॅथलेटिक्स   43 सदस्यीय भारतीय तुकडीचा सहभाग
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पेरू येथे 28 ते 31 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत 43 सदस्यीय भारतीय तुकडी सहभागी होणार आहे. एकूण 23 खेळाडू पुरुषांच्या स्पर्धांमध्ये, तर 20 खेळाडू महिलांच्या स्पर्धेत खेळणार आहेत. भारत 4×400 मीटर मिश्र रिले शर्यतीत देखील भाग घेणार आहे.

पुऊष भालाफेकमधील सध्याचा 20 वर्षांखालील आशियाई विजेता दिपांशू शर्मा हा भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू असेल. या वर्षी एप्रिलमध्ये दुबई येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण सात पदके मिळवली होती. अनुराग सिंह कालेर (गोळाफेक), रणवीर सिंग (3000 मीटर स्टीपलचेस), हर्षित कुमार (हातोडाफेक), पवना नागराज (लांब उडी), एकता डे (3000 मीटर स्टीपलचेस) आणि महिलांच्या 4×400 मीटर रिले संघानेही आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदके मिळविली होती आणि ते आता पेरू येथील ट्रॅक अँड फील्ड स्पर्धांतही झळकणार आहेत.

Advertisement

बापी हंसदा हा डेंग्यूमधून ठीक झालेला असल्याने 4×400 मीटर रिले आणि 400 मीटर स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. डेंग्यूमुळे त्याला एप्रिलमध्ये 20 वर्षांखालील आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपला मुकावे लागले होते. 2022 मध्ये झालेल्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताने दोन रौप्यपदके (सेल्व्हा थिऊमारनने तिहेरी उडीत आणि 4×400 मीटर मिश्र रिलेत) आणि एक कांस्यपदक (400 मीटरमध्ये रूपल चौधरीने) मिळवले होते.

अनेक भारतीय खेळाडू त्यांच्या अॅथलेटिक्स प्रवासात या चॅम्पियनशिपमध्ये खेळले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता आणि भालाफेकमधील वर्तमान विश्वविजेता नीरज चोप्रा हा 20 वर्षांखालील स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा पहिला भारतीय होता. 2016 मध्ये नीरजने सुवर्णपदक जिंकताना 86.48 मीटरची भालाफेक करून कनिष्ठ भालाफेक विक्रम नोंदवला होता. हिमा दास ही या स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक मिळवणारी आणखी एक खेळाडू होती. तिने 2018 च्या स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत ही कामगिरी केली होती.

Advertisement
Tags :

.