पाणमांजर पाळण्याचा प्रकार
त्यांच्या माध्यमातून होते मासेमारी
माणसांनी शतकांपासून प्राण्यांना पाळले असून त्यांचे पोट भरण्यासोबत स्वत:चा फायदाही कमावला आहे. हे देवाणघेवाणीचे नाते अत्यंत जुने आहे. गायी, कोंबडी पाळण्याचा प्रकार सर्रास दिसून येतो
, आता केवळ आवड म्हणून मासे आणि अन्य प्रकारचे जीव पाळले जातात. परंतु एका देशात पाणमांजर पाळले जाते.
पाणमांजर माणसांसाठी कशाप्रकारे उपयुक्त टरू शकते असा प्रश्न उभा ठाकतो. परंतु बांगलादेशात पाणमांजर हे मासे पकडते आणि मच्छिमारांना पैसे कमावून देण्यास मदत करते. बांगलादेशच्या दक्षिण भागात शतकांपासून मासे पकडण्यासाठी खास पद्धतीचा प्रयोग करतात. हे मच्छिमार पाणमांजराद्वारे मासे पकडतात. याकरता पाणमांजराला पाळीव प्राण्यांप्रमाणे पाळतात, मग त्यांना नदी किंवा तलावांमध्ये सोबत नेतात आणि दोरखंडाच्या मदतीने पाण्यात सोडतात. पाणमांजर हे पोहण्यात तरबेज असतात. याचमुळे ते अत्यंत सहजपणे पाण्यात पोहत मासे पकडून स्वत:च्या मालकासाठी आणत असतात.
इन्स्टाग्राम ट्रॅव्हल व्लॉगरने काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ स्वत:च्या अकौंटवर पोस्ट केला होता, ज्यात या तंत्रज्ञानाद्वारे मासे पकडणाऱ्या मच्छिमारांना दाखविण्यात आले होते. या परंपरेलाही आजही येथील मच्छिमार वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. पाणमांजरांना हे मच्छिमार मासे कसे पकडावेत हे शिकवित असतात. या पाणमांजरांकडून संध्याकाळी किंवा रात्रीच मासे पकडविले जात असतात. पाणमांजर पाण्यात जात माशांचा पाठलाग करतात आणि त्यांना मच्छिमारांच्या जाळ्याच्या दिशेने जाण्यास भाग पाडतात. हे मासे जाळ्यात अडकल्याने मच्छिमारांना मोठा लाभ होतो. ही परंपरा आता बांगलादेशच्या काही मोजक्या गावांमध्येच शिल्लक राहिली आहे.
व्हिडिओ होतोय व्हायरल
या व्हिडिओला 14 लाखाहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. हा प्रकार प्राण्यांवर अत्याचार करण्यासारखा आहे. पाणमांजर स्वत:साठी देखील मासे पकडू शकते असे एका युजरने नमूद केले आहे. तर एका युजरने ही परंपरा असून जे लोक याच्या विरोधात आवाज उठवत आहेत, त्यांनी मांसाहार त्यागावा असे सुनावले आहे.