बेकवाडचे दोन तरुण अपघातात ठार
11:10 AM Feb 05, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
खानापूर : खानापूर-गर्लगुंजी मार्गावर दुचाकी आणि कॉलीस कार यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघे तऊण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी 8.30 च्या सुमारास घडली. अपघातील दोघेही मृत तऊण खानापूर तालुक्यातील बेकवाड येथील रहिवासी आहेत. नंदिहळळी येथील सैन्य भरती मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षण केंद्रात सरावासाठी ते दोघे दुचाकीने जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. बेकवाड येथील रामलिंग पांडुरंग मुतगेकर (वय 20) आणि हणमंत महाबळेश्वर पाटील ( वय 19) हे दोघे आपल्या दुचाकीवरुन नंदिहळळी येथील सैन्य भरती मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षण केंद्रात गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षण घेण्यासाठी जात होते. रोजच्याप्रमाणे ते रविवार सकाळी बेकवाड येथून नंदिहळळी येथे जाण्यासाठी निघाले होते. रामलिंग मुतगेकर याच्या दुचाकीवरुन (के. ए. 22-एच. पी-8654) नंदीहळळीला जाण्यासाठी ते निघाले होते. रामलिंग हा दुचाकी चालवत होता. तर त्याच्या मागे हणमंत बसलेला होता. खानापूर-गर्लगुंजी रस्त्यावरील सन्नहोसूर गावाजवळ समोरुन येणाऱ्या जी. ए-01-एस-2973 या कॉलीस कारने दुचाकीला धडक दिल्याने रामलिंग मुतगेकर आणि हणमंत पाटील हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती सन्नहोसूर, निडगल येथील नागरिकांनी खानापूर पोलिसाना दिली. खानापूर पोलिस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक हे आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी तातडीने दाखल होऊन दोघांचे मृतदेह खानापूर इस्पितळात हलवण्यात आले. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. खानापूर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. रामलिंग मुतगेकर आणि हणमंत पाटील या दोघांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, आणि एक भाऊ असा परिवार आहे.
Advertisement
खानापूर-गर्लगुंजी रस्त्यावर दुचाकीला भरधाव कारची धडक
Advertisement
Advertisement
बेकवाड गावावर शोककळा
बेकवाड गावची महालक्ष्मी यात्रा 28 फेब्रुवारीला भरविण्यात येणार आहे. या निमित्त गावात उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. असे असतानाच रविवारी सकाळी झालेल्या अपघातात यात्रोत्सवाच्या तोंडावरच बेकवाड येथील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने गावावरच शोककळा पसरली आहे. दोघांच्याही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
Advertisement
Next Article