महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नानोडा येथील अपघातात दोन युवक ठार

06:55 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नानोडा गावावर शोककळा

Advertisement

लाटंबार्से वार्ताहर

Advertisement

पेठवाडा-नानोडा येथील व्हॅली मिडोज येथील वळणावर माऊती सीयाझ आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात कानोळकरवाडा नानोडा येथील प्रतीक प्रवीण कानोळकर  (वय वर्षे 22) आणि वरचावाडा नानोडा येथील लक्ष्मण मळीक (वय वर्षे 18)  हे जागीच ठार झाले, अशी माहिती डिचोली पोलीस स्थानकातून देण्यात आली.

माऊती सीयाझ जीए 04 ई 1124 ही गाडी दोडामार्गहून म्हापसा या दिशेने जात होती, तर जीए 04 पी 5126 ही पल्स दुचाकी अस्नोडाहून नानोडा या दिशेने जात असता दोघांमध्ये पेठवाडा नानोडा येथील व्हॅली मिडोज जवळच्या वळणावर धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, माऊती गाडी 32.90 मीटर एवढी फरफटत गेली यात माऊती वाहनाच्या वेगाचा अंदाज येतो. दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. सदर अपघात रात्री 10 च्या दरम्यान घडला.

आमदार शेट्यो यांची तत्परता

अपघात घडल्याची माहिती त्याच मार्गावरून जाणाऱ्या डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांच्या नजरेस पडली. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी या अपघाताची माहिती 108 व डिचोली पोलीस स्थानकाला त्वरित दिली. पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. डिचोली पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर आणि पोलीस उपनिरीक्षक विराज धावस्कर, साहाय्यक उपनिरीक्षक लक्ष्मण घाडी अधिक तपास करीत आहे. घटनेचा पंचनामा करून 108 ऊग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना डिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. दरम्यान, माऊतीचालकाला डिचोली पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात नानोडा येथील युवकांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article