Satara Crime : कोरेगावात दोन युवकांना बेदम मारहाण ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शिवसेना उबाठाच्या शहरप्रमुखासह नऊ जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल
एकंबे : कोरेगावच्या जुना मोटार स्टॅण्ड परिसरात गाडी जायला जागा न दिल्याच्या कारणावरून नऊ ते दहा जणांनी दोन जणांना बेदम मारहाण केली. त्यापैकी एकाच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून नेल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी शिवसेना उबाठाचे शहरप्रमुख अक्षय बर्गे यांच्यासह नऊ जणांचा समावेश आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.
याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यातून बुधवारी सकाळी साडेदहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार उदयसिंह अण्णा वलेकर या २३ वर्षीय शेती करणाऱ्या युवकाने फिर्याद दिली असून त्यामध्ये नमूद केले आहे की, सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जुना मोटार स्टॅण्ड येथील याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यातून बुधवारी सकाळी साडेदहा - वाजता मिळालेल्या माहितीनुसार - उदयसिंह अण्णा वलेकर या २३ वर्षीय शेती करणाऱ्या युवकाने - फिर्याद दिली आहे.
त्यामध्ये - नमूद केले आहे की, सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जुना मोटार स्टॅण्ड येथील श्रीकृष्ण बेकरीसमोर गाडी जायला जागा न दिल्याच्या कारणावरून हर्षलभैय्या बर्गे, अक्षय बर्गे, कुणाल शिंदे व आयुष पवार यांच्यासह चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात फायटरने आणि दगडाने मारहाण करून मला व सूरज काळे यांना जखमी केले.
हाताने लाथाबुक्याने मारहाण करत शिवीगाळ केली, तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत माझ्या गळ्यातील अडीच लाख रुपये किमतीची पाच तोळे वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने चोरून नेली आहे.वलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात हर्षलभैय्या बर्गे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख अक्षय बर्गे, कुणाल शिंदे, आयुष पवार व इतर पाच अनोळखी व्यक्तींच्या विरोधात मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके व पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी भेट दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले तपास करत आहेत.