दुचाकी चोरट्यास अटक,12 दुचाकी जप्त
कोल्हापूर :
दुचाकी चोरीचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागताच, त्याच्या आधारे पोलीस रेकॉर्डवरील एका अट्टल दुचाकी चोरट्यास अटक करण्यास कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले. अजय बाळासो पटकारे (वय 41, मुळ रा. सिमा अपार्टमेंट समोर, विचारे माळ, कोल्हापूर, सध्या रा. गवाणे यांच्या मेटकरी मळ्यात, बेळंकी, ता. मिरज, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 6 लाख रूपये किंमतीच्या चोरीच्या 12 दुचाकी जप्त केल्या. यासर्व दुचाकी त्याने कोल्हापूर आणि सांगली जिह्यातून चोरल्या असल्याचे पोलिसांच्या तपासातून पुढे आले, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिली.
पोलीस निरीक्षक कळमकर म्हणाले, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशावऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अमंलदार संजय कुंभार, विशाल चौगुले, महेश खोत, लखन पाटील, सागर माने, महेश पाटील, शुभम संकपाळ, विजय इंगळे व संदिप बेंद्रे यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला. या तपास पथकाने दुचाकी चोरीचे गुन्हे घडलेले ठिकाणी भेटी देऊन गुन्हा घडले ठिकाणावरुन मिळालेले सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अमंलदार लखन पाटील व सागर माने यांना खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली की, दुचाकी चोरी करणारा आरोपी अजय पटकारेने केली असून, तो सध्या बेळंकी (ता. मिरज) येथील गंगा गवाणे यांचे मेटकरी मळ्यात राहत आहे. त्याचेकडे चोरलेली हिरो इग्नायटर मोटर सायकल असल्याची माहिती बातमीदाराकडून समजली. त्यावऊन पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. यावेळी त्याचेकडे चौकशी सुऊ केली. चौकशीमध्ये त्याने ही दुचाकी चोरीची असून, ती दुचाकी कोल्हापूरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली.
पोलीस ठाण्याचे नाव जप्त दुचाकी
शाहूपूरी पोलीस ठाणे, कोल्हापूर 6 दुचाकी आणि 1 मोपेड
राजारामपूरी पोलीस ठाणे, कोल्हापूर 1 दुचाकी
जुना राजवाडा पोलीस ठाणे, कोल्हापूर 2 दुचाकी
मिरज शहर 2 दुचाकी
- पटकारे पोलीस रेकॉर्डवरील दुचाकी चोरटा
सराईत दुचाकी चोरटा म्हणून अजय पटकारे याचे नाव कोल्हापूर व सांगली या दोन जिह्यातील पोलिसांच्या दफ्तरी नोंद आहे. त्याच्याविरोधी कोल्हापूर आणि सांगली जिह्यातील विविध पोलीस ठाण्यात दुचाकीचे 27 दुचाकी चोरीचे गुन्हे आहेत. यातील अनेक गुन्हे सध्या न्याप्रविष्ट आहे. तो कारागृहाची हवा खाऊन कारागृहाबाहेर आहे. दुचाकी चोरी प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक कऊन, त्याच्याकडून पुन्हा चोरीच्या 12 दुचाकी जप्त केल्या.