Accident News : कामावरुन परतताना काळाचा घाला, अपघातात दुचाकीस्वार ठार
शानिवारी सकाळी कामा आवरुन ते आपल्या दुचाकीवरुन परतत होते
तासगाव : सांगली ते मणेराजुरी रोडवर कुमठे गावचे हद्दीत सुमो गाडीची दुचाकीस धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाले. कामावरून घरी परतत असतानाच काळाने घाला घातला. अपघाताची नोंद तासगाव पोलीस ठाण्यात झाली.
या अपघातात नितीन जातिराम बेगडे (43 रा. बेडगे वस्ती, कुमठे ता. तासगाव) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, नितीन बेडगे हे कुपवाड एमआयडीसी येथे कामास होते. शानिवारी सकाळी कामावरून ते आपल्या दुचाकी क्रमांक-एम एच -11-एस-1620 वरून घरी परतत होते.
सकाळी 8.20 च्या दरम्यान ते सांगली ते मणेराजुरी जाणारे रोडवर कुमठे हद्दीतील प्रवीण नगर येथे आले असता कुमठे गावाकडून कुमठे फाट्याकडे येणाऱ्या सुमो क्रमांक-एम एच 12-एफ यु-2836 ची बेडगे यांच्या दुचाकीस समोरून चालकाच्या बाजूने धडक बसली त्यामध्ये त्यांच्या डोक्यात दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले.
दरम्यान, त्यांना सांगली सव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वी ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले, अशी माहिती पालिसांनी दिली. अपघाताचे वृत्त समजतात हेड कॉन्स्टेबल दीपक कुंभार, कॉन्स्टेबल निलेश ढोले यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला.