नंगीवली ते मिरजकर तिकटी मार्गावर दुचाकी लागल्या घसरू
कोल्हापूर :
नंगीवली ते मिरजकर तिकटी मार्गावर रत्याचे काम सुरू असुन याठिकाणी मोठ्याप्रमाणात खोदाई केल्याने रस्त्यावर बारीक खडी पसरली आहे. या खडीवरून दुचाकी घसरू लागल्याने अनेकजण जखमी होत आहेत. खडी व धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ठेकेदाराने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहेत.
शहरातील 100 कोटींच्या निधीतून पाच रस्त्यांचं काम सुरू आहे. याच रस्त्यांच्या कामावरून मोठे राजकारण झाले होते. निधी मंजूर होऊन विविध कारणामुळे काम रखडल्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. निवडणुकीच्या धामधुमीत अजुनही आरोपांच्या फैरी सुरू आहेत. सद्यस्थितीत रस्तांच्या कामाला सुरूवात झाली आहे.
काम सुरू असतानाच रस्त्यावर मोठया प्रमाणात खोदाई केली आहे. त्यातच बारीक खडीही पसरली आहे. याखडीवरून दुचाकी घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. खडीतील मातीमुळे प्रचंड धुळही उडत आहे. दुचाकी चालवत असताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्ता करत असताना सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेवून रस्ता करावा, अशी मागणी होत आहे.