Sangli News : सांगलीत दुचाकी अपघात; पती-पत्नी गंभीर जखमी
सांगलीतील रस्त्यावर दुचाकी धडक प्रकरण;
सांगली: दुचाकीने धडक दिल्यानेझालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मंगळवार बाजार ते अहिल्यादेवी होळकर चौक रस्त्यावर झाला
पाप्रकरणी सुरेश मारुती नागे (वय ६४, रा. बुरुड गल्ली, कर्नाळ पोलीस चौकीनजीक, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मंगळवारी सुरेश नागे आणि त्यांच्या पत्नी असे दोघे दुचाकीवरून (क्र.एमएच १० सीई ९४१७) कच्च्या रस्त्याकडे वळण घेत असताना मागून येणाच्या दुचाकीने (क्र. एमएच १० एक्स २९०४) त्यांना जोरदार पडक दिली.
यामध्ये दुचाकीवरील पती-पत्नी दोघेही जखमी झाले. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. पोलिसांनी दुचाकीस्वार तुषार विक्रम कांबळे (वय २१, रा. गोपाळपुरा, कॉटन मिल चाळ, माधवनगर, सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.