महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दोन दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा

06:21 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टॉप कमांडर रियाझ अहमद दारचा समावेश; अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग

Advertisement

वृत्तसंस्था/ पुलवामा

Advertisement

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिह्यात सोमवार, 3 जून रोजी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांशी सामना केला. पुलवामा जिह्यातील निहामा भागात पहाटे चकमक सुरू झाली होती. दहशतवाद्यांनी प्रथम सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर सैनिकांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी शरणागतीऐवजी संघर्ष केल्यामुळे सुरक्षा दलांनी त्यांचे एन्काऊंटर केले.

या चकमकीत 2015 पासून खोऱ्यात सक्रिय असलेला टॉप कमांडर रियाझ अहमद दार मारला गेला आहे. खोऱ्यातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा हात होता. तसेच अन्य एका सहकाऱ्याचाही खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतल्याचे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक व्ही. के. बिरधी यांनी सांगितले. चकमकीत मारला गेलेला टॉप कमांडर रियाझ दार याच्या कुटुंबीयांना चकमकीच्या ठिकाणी आणण्यात आले, जेणेकरून तो त्यांच्या विनंतीनुसार आत्मसमर्पण करू शकेल. पण, रियाझ दारने शरण येण्यास असमर्थता दर्शवल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

दहशतवाद्यांच्या आश्रयासंबंधी गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने निहामामध्ये घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केल्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. सकाळी सुरू झालेली ही चकमक सायंकाळपर्यंत सुरू होती. सायंकाळच्या सुमारास सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याकडून अधिकृतपणे दोन दहशतवाद्यांचे एन्काऊंटर करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

सुमारे 70 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात

जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी रश्मी रंजन स्वैन यांनी रविवार, 2 जून रोजी नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) सुमारे 60 ते 70 दहशतवादी लॉन्च पॅडवर सक्रिय असून ते घुसखोरीच्या तयारीत असल्याचे सांगितले. दहशतवादी कधीही पाच किंवा सहा जणांच्या गटात घुसखोरी करू शकतात. मात्र, आमचे सुरक्षा जवान शत्रूचा कट यशस्वी होऊ देणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महिन्याभरापूर्वी दोघांचा खात्मा

महिनाभरात काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 7 मे रोजी कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या दहशतवाद्यांमध्ये लष्करचा टॉप कमांडर बासित दार होता. बासितवर 10 लाखांचे बक्षीस होते. काश्मीरमधील अनेक लोकांच्या हत्येत त्याचा हात होता. फहीम अहमद असे ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव आहे. तो दहशतवाद्यांचा मदत करणारा ओव्हर ग्राउंड वर्कर होता. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवादी लपून बसलेल्या घरात स्फोट घडवून आणल्यामुळे घराला आग लागली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article