कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुपवाडा चकमकीत दोन दहशतवादी ठार

06:28 AM Sep 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आठवड्यात दुसऱ्यांदा घुसखोरीचा डाव उधळला

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. रविवारी सकाळी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिह्यातील केरन सेक्टरमधील हैदर चौकीवर घुसखोरीविरोधी कारवाईदरम्यान दोन दहशतवादी मारले गेले. केरन सेक्टरमध्ये दहशतवादी नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना चकमक झाली. मृतदेह नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ पडले आहेत. सीमापार गोळीबाराच्या धोक्यामुळे कडक सुरक्षेत बचावकार्य सुरू होते. ठार झालेल्या दहशतवाद्यांची आणि त्यांच्या संघटनेची ओळख अद्याप उघड झालेली नाही. गेल्या आठवड्याभरात या भागात झालेला घुसरखोरीचा हा दुसरा प्रयत्न उधळून लावण्यात आला.

सुरक्षा दलाच्या जवानांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गटाला आव्हान दिले. यावेळी झालेल्या गोळीबारादरम्यान हैदर चौकीजवळ दोन दहशतवादी मारले गेले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या संघर्षानंतर परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

गेल्या आठ दिवसांत सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेली ही दुसरी चकमक आहे. यापूर्वी, 20 सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला होता. तसेच एका एसपीओसह दोन पोलीस जखमी झाले होते. दोडाच्या दुडू-बसंतगड आणि भदरवाहच्या सोजधर जंगलात ही चकमक झाली होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article