महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोन दहशतवाद्यांना कुपवाडामध्ये कंठस्नान

07:00 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिह्यातील गुगलधरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. लष्कर आणि पोलिसांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शुक्रवार, 4 ऑक्टोबर रोजी लष्कर आणि पोलिसांच्या पथकाला एक संशयास्पद प्रकार निदर्शनास आल्यानंतर संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली. घुसखोरी हाणून पाडण्यासाठी कारवाई होत असल्याचे लक्षात येताच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिह्यातही शुक्रवारी गोळीबार झाला. दहशतवाद्यांची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी किश्तवाडच्या चतरू गावात कारवाई सुरू केल्याचे भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article