महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोन दहशतवाद्यांना अमृतसरमध्ये अटक

06:42 AM Dec 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोलीस स्थानकावर बॉम्बफेक : हँडग्रेनेड, पिस्तूल, हेरॉईन जप्त

Advertisement

वृत्तसंस्था/ अमृतसर

Advertisement

पंजाबमधील राज्य स्पेशल ऑपरेशन सेलने (एसएसओसी) केलेल्या  कारवाईमुळे परदेशातून चालवल्या जाणाऱ्या नार्को-टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश झाला आहे. अमृतसरमधील पोलीस स्टेशनवर ग्रेनेड फेकणाऱ्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1.4 किलो हेरॉईन, 1 हँडग्रेनेड आणि 2 पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी 17 डिसेंबर 2024 रोजी पोलीस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला केला होता.

पोलीस स्थानकावरील हल्ल्याप्रकरणी अमृतसर ‘एसएसओसी’ने गुरजीत सिंग (रा. दांडे, अमृतसर ग्रामीण) आणि बलजीत सिंग (रा. चापा, तरनतारन) यांना अटक करण्यात आली आहे. हे मॉड्यूल परदेशातून चालवले जात असल्याचे उघड झाले आहे. अटकेतील दोन्ही आरोपी ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीतही सहभागी होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अटक करण्यात आलेले आरोपी परदेशात बसलेल्या ऑपरेटर्सच्या सूचनेनुसार काम करत असल्याचे समोर आले आहे. बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी हॅपी पासियान, सहकारी जीवन फौजी आणि गोपी नवांशरिया यांनी या हल्ल्याची जबाबदारी यापूर्वीच घेतली आहे.

या मॉड्यूलशी संबंधित इतर लोकांना पकडण्यासाठी तपास तीव्र करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीच्या आधारे अन्य नेटवर्कचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर या दोन आरोपींसह आतापर्यंत पोलिसांनी हॅप्पी पासियांच्या 16 आरोपींना अटक केली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये तीन आरोपींची हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशमध्ये मारले गेलेले आरोपी गुरुदासपूरमध्ये स्फोट घडवून पळून गेले होते.

अमृतसरमधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यानंतर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. हे धोके टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस बंदोबस्त करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस ठाण्याच्या संरक्षक भिंती प्रत्येकी पाच-पाच फूट उंच केल्या जात आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article