महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चोरी प्रकरणात दोन संशयितांना अटक

11:33 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : मेरशी येथे सोन्याचे दागिने पॉलीश करून देण्याचे निमित्त करून 1 लाख 70 हजार ऊपये किमतीचे दागिने पळविणाऱ्या दोन संशयितांना ओल्ड गोवा पोलिसानी अठक केली. संशयितांच्या विरोधात भादंसं कलम 406, 420, 379, अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. याबाबत रत्ना शिरसंगी या महिलेने तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद फिरोज (31, रा. बिहार.), विक्रम  वाल्मिकी भगत (37, दिल्ली) या दोन्ही संशयितांनी तक्रार महिलेला फसवून तिच्याकडील सोन्याचे दागिने घेऊन पॉलीश करतो म्हणून सांगितले. त्यावेळी दागिने वितळले आणि त्याच्यातील सोने चोरले. सुमारे 1 लाख दहा हजार ऊपये किमतीचे सोने संशयितांनी चोरले होते. प्रकार महिलेच्या लक्षात येताच तिने पोलीस स्थानक गाठले. पोलिसांनी संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. ओल्ड गोवा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article