खरवते सड्यावर आढळली दोन कातळशिल्पे
राजापूर :
मानवाच्या हजारो वर्षापूर्वीच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा सांगणारी मानवी देहाची ठेवण असलेली तलवार घेऊन योद्ध्याच्या भूमिकेमध्ये असणारी मानवी आकृती आणि मानवी हाताचा पंजा अशी दोन कातळशिल्पे राजापूर तालुक्यातील खरवते येथे आढळून आली आहेत.
सड्यावरील जांभ्या दगडाच्या कातळामध्ये कोरलेली ही वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्पे खरवतेच्या सड्यावर पहिल्यांदा आढळून आली 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत या कातळशिल्पांसह सड्यावरील जैवविविधततेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी खरवते ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे.
निसर्गयात्री संस्थाप्रमुख, कातळशिल्प संशोधक सुधीर रिसबुड, धनंजय मराठे आणि खरवते येथील ज्येष्ठ ग्रामस्थ गंगाराम चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार सरपंच अभय चौगुले, उपसरपंच गौरव सोरप, ग्रामपंचायत सदस्य किशोर चौगुले, संतोष चौगुले, जान्हवी माटल, सत्यवती बावकर, वैशाली चौगुले, ग्रामपंचायत अधिकारी नेहा कुडाळी, ग्रामपंचायत कर्मचारी देवीदास उबाळे, संजय माटल, केंद्रचालक मक्ती माटल, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षक चैत्रा गुरव, पर्यावरणप्रेमी प्रशांत चौगुले या टीमने या कातळशिल्पांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम राबविली होती. त्यामध्ये या वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्पांचा शोध लागल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी कुडाळी यांनी दिली.