For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेरॉइन, पिस्तूलसह दोन तस्करांना अटक

06:28 AM Jun 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
हेरॉइन  पिस्तूलसह दोन तस्करांना अटक
Advertisement

वृत्तसंस्था/ अमृतसर

Advertisement

अमृतसर जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने दोन तस्करांना अटक करत मोठ्या प्रमाणात हेरॉइन आणि आधुनिक शस्त्रs जप्त केली आहेत. अटक केलेल्या आरोपींची नावे लवप्रीत सिंग आणि बलविंदर सिंग अशी आहेत. ते लोपोके येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी या तस्करांकडून 6.15 किलो हेरॉइन, एक पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि दहा हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. अटक केलेल्या आरोपींचे पाकिस्तानमधील तस्करांशी संबंध असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. सीमावर्ती भागातील तस्कर पाकिस्तानातून हेरॉइन आयात करून त्याचा भारतात पुरवठा करतात.

पाकिस्तानमधून हेरॉइनचा मोठा साठा पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. यासंदर्भात तपास करत असताना शनिवारी पोलिसांना दोन तस्कर हेरॉइन पोहोचवत असताना जाळ्यात सापडले. पोलिसांनी नाकाबंदी करत दोन्ही आरोपींना पकडले. घटनास्थळी त्यांच्याकडून हेरॉइन, पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. सध्या, पोलीस या दोन्ही आरोपींची चौकशी करत आहेत. यांच्या इतर साथीदारांना अटक करण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.