For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पाइसजेटच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे राजीनामे

06:50 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पाइसजेटच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे राजीनामे
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

रोख रकमेचा तुटवडा आणि कायदेशीर लढाईला तोंड देत असलेल्या स्पाइसजेट या विमान कंपनीच्या मुख्य वाणिज्य अधिकारी (सीसीओ) शिल्पा भाटिया आणि सीओओ अरुण कश्यप यांनी राजीनामा दिला आहे.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भाटिया आणि कश्यप एकत्र नवीन चार्टर एअरलाइन व्यवसाय सुरू करणार आहेत. सध्या हे दोन्ही अधिकारी कंपनीत नोटीस कालावधीवर असून, कालावधी 31 मार्च रोजी संपत आहे.

Advertisement

अरुण कश्यप यांची पत्नी मीनाक्षी कश्यप आणि शिल्पा भाटिया यांचे पती अजय भाटिया यांनी ऑगस्ट 2023 मध्ये सिरियस इंडियन एअरलाइन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली.

यावर स्पाइसजेटने म्हटले होते की, स्पाइसजेटच्या संमतीशिवाय सिरियस एअरलाइन पुढे काहीही करणार नाही. अरुण कश्यपनेही 2022 मध्ये कंपनी सोडली होती. सीओओ अरुण कश्यप यांनी यापूर्वी 2022 मध्ये स्पाइसजेट सोडले होते आणि मुख्य अधिकारी म्हणून एअर इंडियामध्ये सामील झाले होते, परंतु एका वर्षाच्या आत त्यांनी एअर इंडिया सोडली आणि पुन्हा स्पाइसजेटमध्ये सामील झाले. कश्यपने जेट एअरवेज आणि ओमान एअरमध्ये काम केले आहे. याआधी ते स्पाइसजेटमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते. राजीनाम्याच्या वृत्तानंतर शेअर्समध्ये 7.20 टक्क्यांची घसरण दिसून आली.

Advertisement
Tags :

.