For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईटीएफमधील सोने गुंतवणुकीकडे कल

06:16 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
ईटीएफमधील सोने गुंतवणुकीकडे कल
Advertisement

मागील 1 वर्षात 25 टक्क्यांपर्यंत परतावा : अधिक सुरक्षित गुंतवणूक

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

सोन्याने 74,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी ओलांडली आणि आतापर्यंतचा उच्चांक गाठला. आयबीजेएनुसार, या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमती 10,870 रुपयांनी वाढल्या आहेत. 1 जानेवारीला सोन्याचा भाव 63,352 रुपये होता, तो आता 74,222 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

Advertisement

तज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत त्यात तेजी पाहायला मिळू शकते आणि या वर्षाच्या अखेरीस ती 85 हजारांवर जाऊ शकते. तुम्हीही सोन्यात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. गेल्या 1 वर्षात 25 टक्के पर्यंत परतावा दिला आहे.

ईटीएफ सोन्याच्या वाढत्या आणि घसरलेल्या किमतींवर आधारित असतात. एक्सचेंज ट्रेडेड फंड हे सोन्याच्या चढ-उतार होणाऱ्या किमतींवर आधारित असतात. एक गोल्ड ईटीएफ युनिट म्हणजे 1 ग्रॅम सोने. ते पूर्णपणे शुद्ध आहे. गोल्ड ईटीएफचे शेअर्स खरेदी आणि विक्री बीएसई व एनएसईवर करता येतात. मात्र, त्यात तुम्हाला सोने मिळत नाही. जेव्हा तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे असेल, तेव्हा तुम्हाला त्यावेळी सोन्याच्या किमतीएवढे पैसे मिळतील.

गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचे 5 फायदे

सोने कमी प्रमाणात देखील खरेदी केले जाऊ शकते: इटीएफद्वारे, सोने युनिटमध्ये खरेदी केले जाते, जेथे एक युनिट एक ग्रॅम असते. यामुळे एसआयपी (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) द्वारे कमी प्रमाणात सोने खरेदी करणे सोपे होते. दुसरीकडे, भौतिक सोने सामान्यत: एक तोळा (10 ग्रॅम) किमतीला विकले जाते. अनेक वेळा ज्वेलर्सकडून खरेदी करताना कमी प्रमाणात सोने खरेदी करणे शक्य होत नाही.

शुद्ध सोने : सोन्याच्या ईटीएफची किंमत पारदर्शक आणि समान आहे. हे मौल्यवान धातूंवरील जागतिक प्राधिकरण असलेल्या लंडन बुलियन मार्केट असोसिएशनचे अनुसरण करते. त्याचवेळी, भौतिक सोने भिन्न विक्रेते/ज्वेलर्स वेगवेगळ्या किमतीत देऊ शकतात. गोल्डइटीएफ मधून खरेदी केलेले सोने 99.5 टक्के शुद्ध असण्याची हमी आहे. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याची किंमत या शुद्धतेवर आधारित असेल.

ज्वेलरी बनवण्याचा अधिक खर्च नाही: गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यासाठी 1टक्के पेक्षा कमी ब्रोकरेज आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापनासाठी 1 टक्के वार्षिक शुल्क लागते. तुम्ही नाणी किंवा बार खरेदी केले तरीही ज्वेलर्स आणि बँकांना द्याव्या लागणाऱ्या 8 ते 30 टक्के मेकिंग चार्जेसच्या तुलनेत हे प्रमाण काहीच नाही.

सोने सुरक्षित: इलेक्ट्रॉनिक गोल्ड डीमॅट खाते असते. ज्यामध्ये डीमॅट शुल्क फक्त वार्षिक भरले जाते. सोबतच चोरी होण्याची भीतीही नाही. त्याचवेळी, भौतिक सोन्याच्या चोरीच्या जोखमीशिवाय, त्याच्या सुरक्षिततेवर देखील खर्च करावा लागतो.

व्यापारात सुलभता : गोल्ड ईटीएफ कोणत्याही त्रासाशिवाय त्वरित खरेदी आणि विकले जाऊ शकतात. गोल्ड ईटीएफचा वापर कर्ज घेण्यासाठीसुद्धा केला जाऊ शकतो.

Advertisement
Tags :

.