महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोन शास्त्रज्ञांना ‘फिजिक्स’चे ‘नोबेल’

06:25 AM Oct 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘कृत्रिम बुद्धीमत्ते’च्या साहाय्याने यंत्रशिक्षण क्षमता वाढविण्याच्या प्रयोगाचा सन्मान

Advertisement

वृत्तसंस्था / स्टॉकहोम

Advertisement

भौतिक शास्त्राचा (फिजिक्स) 2024 चा नोबेल महापुरस्कार दोन शास्त्रज्ञांना घोषित करण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या ‘कृत्रिम बुद्धीमत्ते’च्या साहाय्याने यंत्रशिक्षण क्षमता वाढविण्याच्या यशस्वी प्रयोगाचा सन्मान नोबेल पुरस्कारांचे वितरण करणाऱ्या ‘रॉयल स्वीडीश अॅकेडमी’ने अशा प्रकारे केला आहे. विज्ञान क्षेत्रात हा एक अद्भूत प्रयोग मानला जात आहे. हा मूलभूत शोध मानला जातो.

जॉन ए. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन अशी हा पुरस्कार मिळविणाऱ्या शास्त्रज्ञांची नावे आहेत. गेली 30 वर्षे या दोन्ही संशोधकांनी या विषयावर संशोधन केले आहे. जॉफ्री हिंटन हे कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचे महर्षी मानले जातात. त्यांनी भौतिकशास्त्रातील साधनांचा उपयोग करुन कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा विकास केलेला आहे. सध्याच्या काळात यंत्रशिक्षण (मशिन लर्निंग) चे अनन्यसाधारण महत्व आहे. या दोन्ही संशोधकांनी शोधलेले तंत्रज्ञान मशिन लर्निंगची क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहे. मानवाला साहाय्यभूत ठरेल अशा प्रकारची ‘कृत्रिम स्मरणशक्ती’ निर्माण करण्यात या दोन्ही संशोधकांचे महत्वाचे योगदान आहे. त्यांचा शोध कृत्रिम बुद्धमत्तेच्या क्षेत्रातील मूलभूत शोध मानला जात आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अनिर्बंध उपयोगाला विरोध

कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान अनेक क्षेत्रांमध्ये मानवाला उपयोगी पडेल आणि त्याच्या प्रगतीत हातभार लावले असे आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा अनिर्बंध उपयोग हानीकारक ठरणार आहे, असा इशारा हिंटन यांनी मागच्या वर्षी दिला होता. ते जरी या क्षेत्रातले महत्वाचे शास्त्रज्ञ असले, तरी त्यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेच्या दुरुपयोगाविषयीही अनेकदा लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

दोन्ही अमेरिकेचे संशोधक

जॉन हॉपफिल्ड आणि जॉफ्री हिंटन या दोन्ही संशोधकांनी आपले संशोधन बव्हंशी अमेरिकेत केले आहे. हॉपफिल्ड हे अमेरिकेचे असून हिंटन हे जन्माने ब्रिटीश कॅनेडियन असले तरी त्यांचे संशोधन अमेरिकेतच झाले आहे. त्यामुळे या दोघांनाही अमेरिकन शास्त्रज्ञच मानले जात आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्र नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे महान कार्य या दोन्ही संशोधकांनी केले आहे.

हिंटन याचे दशकभराचे प्रयत्न

हिंटन यांनी 30 वर्षे भौतिक शास्त्रात संशोधन केले आहे. मात्र मागची 10 वर्षे त्यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता संशोधनालाच वाहिली आहेत. या क्षेत्रातील विविध विभागांमध्ये त्यांनी अजोड संशोधन केले असून त्यांनी निर्माण केलेल्या उपकरणांमुळे हे तंत्रज्ञान उपयोगात आणणे सर्वसामान्यांनाही सुलभ झाले आहे, असे मत या क्षेत्रातील अनेक अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग कसा, किती प्रमाणात आणि कोणी केला पाहिजे, यावरही हिंटन यांनी वेळोवेळी केलेले भाष्य मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत आहे.

कृत्रिम बुद्धीमत्तेचा शिक्षणात उपयोग

कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग आता बहुविध क्षेत्रांमध्ये केला जात आहे. मानवाला प्रत्येक क्षेत्रात साहाय्यभूत ठरण्याची या तंत्रज्ञानाची क्षमता आहे. शिक्षण आणि शिक्षण प्रसार या क्षेत्रांमध्ये हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात साहाय्यभूत ठरु शकते, असे नोबेल पुरस्कार विजेत्या दोन्ही संशोधकांचे मत आहे. यंत्रशिक्षण किंवा मशिन लर्निंग या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक उत्तम प्रकारे आत्मसात करता येते, हे त्यांनी विविध उपकरणांच्या, नेटवर्किंगच्या आणि सूत्रांच्या साहाय्याने दाखवून दिले आहे. सध्याच्या काळात हे संशोधन मानवासाठी पथदर्शक म्हणून सिद्ध होईल, असे त्यांची पुरस्कारसाठी निवड करणाऱ्या नोबेल समितीनेही स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article