दोन ग्रामविकास अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात
कोल्हापूर :
पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना शाहुवाडी तालुक्यातील दोघा ग्रामविकास अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी रंगेहाथ पकडून अटक केली. सचिन बाळकृष्ण मोरे (वय 44), प्रथमेश रविंद्र डंबे (वय 22, दोघे रा. जुने पारगाव, ता. हातकणंगले) अशी त्याची नावे आहेत. या दोघापैकी सचिन मोरे हा परखंदळे व बांबवडे या दोन ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी काम पाहत आहे. तर प्रथमेश डंबे हा साळशी व पिशवी या दोन ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम पाहात होते.
तक्रारदार महिलेच्या सासऱ्याच्या नावाने बांबवडे (ता. शाहुवाडी) गावात घर आहे. त्याचा काही महिन्यापूर्वी मृत्यु झाला. त्यामुळे त्याच्या नावावरील घरावर आपले नाव लावण्यासाठी सासऱ्याच्या मृत्यु दाखल्यासह अन्य कागदपत्रे गावच्या ग्रामपंचायतीकडे दिले होते. याचदरम्यान ग्रामपंचयातीचे ग्रामविकास अधिकारी सचिन मोरे याने तक्रारदार महिलेकडे घराचा घरटान उत्तारा देण्यासाठी 20 हजार ऊपयाच्या लाचेची मागणी केली. यादरम्यान तक्रादार महिलेने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीची पडताळणी केली असता ग्रमाविकास अधिकारी मोरेने तडजोडीअंती पाच हजार ऊपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावऊन त्याला पकडण्यासाठी बुधवारी सापळा लावण्यात आला. याचवेळी मोरेने लाचेची रक्कम त्याचा गावाचा आणि साळशी आणि पिशवी (ता. शाहुवाडी) या दोन ग्रामपंचयातीचा ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करीत असलेला प्रथमेश डंबे याच्याकडे देण्याबाबत सांगितले. मोरेच्या सांगण्यावऊन लाचेचे 5 हजार ऊपये स्विकारताना डंबेसह मोरेला रंगेहाथ पकडले. या दोघा संशयीताविरोधी शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
संशयित मोरे व डंबे एकाच गावचे
पाच हजार ऊपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडलेले ग्रामविकास अधिकारी सचिन मोरे व ग्रामविकास अधिकारी प्रथमेश डंबे हे दोघे जुने पारगाव (ता. हातकणंगले) या एकाच गावचे राहणारे आहे. ग्रामविकास अधिकारी डंबे हा गेल्या काही महिन्यापूर्वीच ग्रामविकास अधिकारी म्हणून नोकरीवर ऊजु झाला होता. या दोघा ग्रामविकास अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडल्याचे वृत्त समजताच जुने पारगावमध्ये एकच चर्चा केली जात होती.