For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीसी ज्वेलर्सच्या दोन निवासी मालमत्ता एसबीआयच्या ताब्यात

04:51 PM Nov 30, 2023 IST | Kalyani Amanagi
पीसी ज्वेलर्सच्या दोन निवासी मालमत्ता एसबीआयच्या ताब्यात
Advertisement

एसबीआयचे 1,169 कोटी रुपयांचे कर्ज फेडू शकले नसल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने PC ज्वेलर्सची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. ही बातमी समजताच PC ज्वेलर्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये सुमारे 1.39 टक्क्यांची घसरण झाली. पीसी ज्वेलर्सचे शेअर्स गेल्या पाच दिवसांत तीन टक्क्यांनी घसरले आहेत.

Advertisement

स्टेट बँक ऑफ इंडियाने पीसी ज्वेलर्सच्या या मालमत्तेशी कोणताही व्यवहार न करण्याचा इशारा दिला आहे कारण बँकेला त्यातून 1,267 कोटी रुपये वसूल करायचे आहेत. यासोबतच स्टेट बँक ऑफ इंडियाने इतर कर्जदारांच्या कर्जाची रक्कमही त्यात जोडली आहे.स्टेट बँक ऑफ इंडियाने यापूर्वीच पीसी ज्वेलर्सविरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात खटला दाखल केला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पीसी ज्वेलर्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत 3,466 कोटी रुपयांचे कर्ज चुकवल्याचे सांगितले होते.पीसी ज्वेलर्सचा देशांतर्गत व्यवसाय 33 कोटी रुपयांवर घसरला आहे. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत तो 836 कोटी रुपये होता. गेल्या काही काळापासून पीसी ज्वेलर्सच्या कामकाजात अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.