कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोन पाकिस्तानी हेरांना पंजाबमध्ये अटक

06:23 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संवेदनशील लष्करी माहिती लीक केल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ अमृतसर

Advertisement

लष्कराच्या छावणी आणि एअरबेस परिसरातील संवेदनशील माहिती आणि छायाचित्रे लीक केल्याच्या आरोपाखाली पंजाबमधील अमृतसरमध्ये दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दोघेही पाकिस्तानी हेर असल्याचा संशय आहे. पलक शेर मसीह आणि सूरज मसीह हे दोघे संशयित आरोपी पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. अटक केलेले दोन्ही संशयित हरप्रीत सिंग उर्फ हॅपीच्या सूचनेनुसार कारनामे करत होते. हरप्रीत सिंग सध्या अमृतसर मध्यवर्ती कारागृहात आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात दहशतवादी आणि पाकिस्तानी हेरांचा शोध तीव्र झाला आहे. याचदरम्यान कॅन्टोन्मेंट आणि एअरबेस परिसरातील सुरक्षा फुटेज शेअर करण्याच्या आरोपाखाली दोघांवर कारवाई करण्यात आली. या संशयितांवर सुरक्षाविषयक धोरणात्मक माहिती शेअर करण्याचा आरोप आहे. देशाच्या सुरक्षेचा विचार करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दोघांवरही गुपिते कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात आणखी लोकांचा सहभाग असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय गुप्तचर आणि कायदा अंमलबजावणी संस्था सीमापार हेरगिरीच्या धोक्याविरुद्ध कडक सुरक्षा उपाययोजनांसह सज्ज झाली आहे. याचदरम्यान शनिवारी भारतीय सैन्याने राजस्थानमधून एका पाकिस्तानी सैनिकावरही कारवाई केली. राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवरून बीएसएफने एका सशस्त्र पाकिस्तानी सैनिकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सध्या सुरू असल्याचे समजते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article