For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

24 लाखाच्या फसवणूकप्रकरणी सुरतमधून अन्य दोघांना अटक

01:29 PM Sep 13, 2024 IST | Abhijeet Khandekar
24 लाखाच्या फसवणूकप्रकरणी सुरतमधून अन्य दोघांना अटक
arrested from Surat
Advertisement

खेड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, याअगोदर दोघांना घेतलेय ताब्यात

खेड / प्रतिनिधी

शहरातील एका तरुणाची 24 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिम्मीभाई सुनिलभाई भगत (40 रा. गलेमांडी-सुरत) आणि सोनू रामलाल टेलर (24 रा. दिनोडली-सुरत) या दोघांच्या गुरुवारी सुरत येथे मुसक्या आवळल्या. दोघांचेही मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपींची संख्या चार झाली असून यातील अन्य दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.

Advertisement

ए. आर. के. या व्हॉटस्अप ग्रुपवरून ट्रेडिंग संदर्भातील संदेश पाठवत कंपनीत पैशांची गुंतवणूक केल्यास जादा रक्कमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवत येथील एका तरुणाची 24 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच नीरज महेंद्र नांगरा (22, चंढीगड-हरियाणा) याला गजाआड केले आहे. सखोल चौकशीअंती आणखी एकाचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर नारायणलाल जोशी (42, सध्या रा. सुरत-गुजरात, मूळगाव उदयपूर-राजस्थान) यालाही गजाआड करण्यात आले. या दोघांची सखोल चौकशी केल्यानंतर यात आणखी दोघांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे अन्य दोघांना गुरुवारी अटक केली. दोघांकडून 40 हजार रुपये किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे. पोलीस पथकात हेडकॉन्स्टेबल दीपक गेरे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बांगर, वैभव ओहोळ, रमिज शेख, निलेश शेलार, सायबर क्राईमचे सौरभ कदम यांचा पथकात समावेश होता. या फसवणूक प्रकरणात आणखी काही धागेदोरे हाती लागतात का यादृष्टीने पोलिसांकडून तपास गतीमान करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.