गणपतीपुळेत जेएसडब्ल्यूच्या दोघा अधिकाऱ्यांचा बुडून मृत्यू! समुद्रस्नाचा मोह जीवावर बेतला
एकाला वाचविण्यात यश!
गणपतीपुळे वार्ताहर
येथील समुद्रात समुद्रस्नानासाठी उतरलेल्या जेएसडब्लू पोर्टच्या दोघा अधिकाऱ्यांचा बुडून मृत्यू झाल़ा. तर अन्य एकाला वाचविण्यात जीवरक्षक व स्थानिक व्यावसायिकांना यश आल़े. ही घटना रविवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडल़ी आसिफ हुसेन (35 ऱा पश्चिम बंगाल, सध्या ऱा जयगड) व प्रदीप कुमार (30, ऱा ओडिशा, सध्या जयगड) अशी मृतांची नावे आहेत. तर ठुकु डाकवा (30, ऱा उत्तराखंड, सध्या जयगड) याला वाचविण्यात आल़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सुट्टी असल्याने जयगड येथील जेएसडब्लू मरीन पोर्ट कंपनीचे तिघे अधिकारी गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होत़े. गणपती दर्शन घेतल्यानंतर तिघेही समुद्रकिनारी फेरफटका मारत होत़े. यावेळी पदीप कुमार, आसिफ हुसेन व ठुकू डाकवा यांना समुद्रस्नान घेण्याचा मोह निर्माण झाल़ा तिघे समुद्राच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरल़े परंतु, मागील दोन ते तीन दिवसांपासून असणाऱ्या पावसाळी वातावरणामुळे समुद्रात लाटांना जोर होता. त्यातच समुद्रस्नानाचा आंनद घेताना हे तिघे खोल पाण्यात ओढले गेल़े.
तिघेही पाण्यामध्ये ओढले गेल्याने त्यांनी बचावासाठी आरडा-ओरडा केल़ा तिघे जण बुडत असल्याचे दिसून येताच समुद्रकिनाऱयावर मोठा गोंधळ उडाल़ा घटनेचे पसंगावधान राखून समुद्रकिनारी असलेल्या जीवरक्षक व स्थानिक व्यावसायिक यांनी मदतीसाठी धाव घेतल़ी. मात्र लाटांच्या तडाख्यामुळे मदतकार्यात अडचणी निर्माण होत होत्य़ा असे असतानाही जिवाची बाजी लावून जीवरक्षक यांनी तिघांनाही पाण्याबाहेर काढल़े. या तरुणांची पकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने नजीकच असलेल्या मालगुंड पाथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आल़े. यावेळी वैद्यकीय अधिकाऱयांनी दोघांना तपासून मृत घोषित केल़े तर ठूकू डाकवा याच्यावर उपचार करण्यात येत असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांकडून सांगण्यात आले आह़े. तिन्ही तरुणांना वाचविण्यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अजिंक्य रामानी, अनिकेत राजवाडकर, महेश देवरुखकर यांनी तात्काळ समुद्रात उड्या घेतल्या. त्यांच्यासमवेत स्थानिक व्यावसायिक निखिल सुर्वे व अन्य व्यावसायिकांनी धाव घेतली व मदतीसाठी सहकार्य केले. या घटनेचा अधिक तपास जयगड पोलिसांकडून करण्यात येत आह़े तसेच या घटनेचा पंचनामा जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आलेल्या आह़े यावेळी पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते.