कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय पुरुष हॉकी संघात दोन नवे चेहरे

06:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / बेंगळूर

Advertisement

येथील साई केंद्रामध्ये सुरू असलेल्या भारतीय वरिष्ठ पुरुष हॉकी संघासाठीच्या सरावाच्या शिबिरामध्ये 38 हॉकीपटूंचा समावेश होता. आता यामध्ये मध्यप्रदेशचा प्रताप लाक्रा आणि उत्तरप्रदेशचा उत्तम सिंग या दोन नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता या सराव शिबिरात 40 हॉकीपटूंना मार्गदर्शन मिळणार आहे. भारतीय वरिष्ठ पुरुष हॉकी संघाच्या या सराव शिबिराला 25 एप्रिलपासून प्रारंभ झाला होता. सुरुवातीला या शिबिरात 54 संभाव्य हॉकीपटूंचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान हॉकी शिबिरातील एक आठवड्याचा कालावधी झाल्यानंतर खेळाडूंची संख्या कमी करण्यात आली आणि ती 40 अशी ठेवण्यात आली आहे.

Advertisement

नुकत्याच झालेल्या 15 व्या वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेतील हॉकीपटूंच्या कामगिरीचा आढावा घेवून प्रताप लाक्रा आणि उत्तम सिंग यांची या शिबिरासाठी निवड करण्यात आली. या शिबिरामध्ये गोल रक्षक कृष्णन् बहाद्दुर पाठक, सुरज करकेरा, पवन आणि मोहीत शशिकुमार यांचाही समावेश आहे. बचावफळीतील अमित रोहीदास, वरुणकुमार, जुगरासिंग, निलम संजीव झेस, अमनदीप लाक्रा, हरमनप्रित सिंग, जर्मनप्रित सिंग, संजय, यशदीप शिवाच, मोहम्मद मोसेन तसेच नवोदित प्रताप लाक्राचा यामध्ये समावेश आहे. मध्यफळीतील राजकुमार पाल, निलकांत शर्मा, हार्दीक सिंग, सुमित, एम. रविचंद्र सिंग, पुवन्ना चांदुरा बॉबी, राजेंद्र सिंग, विष्णूकांत सिंग, मनप्रित सिंग, विवेक सागर प्रसाद, समशेर सिंग त्याच प्रमाणे आघाडी फळीतील बॉबीसिंग धामी, एस. कार्टी, सुनील जोजो, मनदीप सिंग, ललितकुमार उपाध्याय, दिलप्रित सिंग, सुखजित सिंग, सुदीप चिमको, अंगड बीरसिंग व उत्तम सिंग यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article