For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नौदलाच्या दोन महिला अधिकारी जाणार जागतिक सागरी मोहिमेवर

06:19 AM Sep 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
नौदलाच्या दोन महिला अधिकारी जाणार जागतिक सागरी मोहिमेवर
Advertisement

लेफ्टनंट कमांडर ए. रुपा आणि के. दिलना यांचा सहभाग

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी जागतिक सागरी मोहिमेचा भाग असणार आहेत. लेफ्टनंट कमांडर ए. रुपा आणि के. दिलना ह्या दोन महिला अधिकारी आयएनएसव्ही तारिणी जहाजावरील दुसऱ्या नाविका सागर परिक्रमा मोहिमेत सहभागी होतील. यासाठी दोन्ही अधिकारी गेल्या तीन वर्षांपासून तयारी करत होत्या. ह्या दोघी अधिकारी गोव्यापासून ब्राझीलमधील रिओ दी जानेरोपर्यंतच्या ट्रान्स-ओशियन मोहिमेवरील सहा सदस्यीय पथकात सहभागी झाल्या होत्या.

Advertisement

तीन वर्षांच्या तयारीनंतर भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी लवकरच जगभरातील खडतर प्रवासाला निघणार आहेत, असे नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल यांनी सांगितले. केरळमधील कोझिकोड येथील रहिवासी असलेले लेफ्टनंट कमांडर के. दिलना जून 2014 मध्ये नौदलात दाखल झाल्या होत्या. त्यांचे वडील दिवंगत देवदासन हे भारतीय लष्करात कार्यरत होते. लेफ्टनंट कमांडर ए. रुपा ह्या मूळच्या पाँडिचेरी येथील असून त्या जून 2017 मध्ये नौदलात ऊजू झाल्या होत्या. त्यांचे वडील जी. पी. अलागिरीसामी हे भारतीय हवाई दलाचे सदस्य होते.

जागतिक सागर परिक्रमा हा एक कठीण प्रवास असून त्यासाठी प्रभावी कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक सतर्कतेची आवश्यकता असते. या मोहिमेसाठी महिला अधिकाऱ्यांनी कठोर प्रशिक्षण घेत अनेक मैलांच्या सागरी प्रवासाचा सराव केला आहे. प्रसिद्ध नाविक आणि गोल्डन ग्लोब रेसचे नायक निवृत्त कमांडर अभिलाष टॉमी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. सहा सदस्यीय संघाचा एक भाग म्हणून या अधिकाऱ्यांनी गेल्यावषी गोवा ते दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन मार्गे ब्राझीलमधील रिओ दि जानेरोपर्यंतच्या ट्रान्स-ओशियन मोहिमेत भाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी गोवा ते पोर्ट ब्लेअरपर्यंत जाणे-येणे अशी दुहेरी हाताने नौकानयन मोहीमही पूर्ण केली. तसेच या वर्षाच्या सुरुवातीला दोघींनी गोव्यापासून पोर्ट लुईस, मॉरिशसपर्यंत पुन्हा त्याच मोडमध्ये यशस्वीपणे उड्डाण केले होते.

Advertisement
Tags :

.