For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पॅरासिटेमॉलसहित 53 औषधे ‘नापास’

06:55 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
पॅरासिटेमॉलसहित 53 औषधे ‘नापास’
Advertisement

केंद्र सरकारकडून सूची घोषित : अनेक लोकप्रिय औषधांचा सूचीत समावेश

Advertisement

वृत्तसंस्था / .नवी दिल्ली

जंतुविनाशासाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या पॅरासिटेमॉल या औषधासहित आणखी 52 औषधे, अर्थात एकंदर 53 औषधे गुणवत्तेच्या निकषावर अयशस्वी ठरली आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने प्रसारित केली आहे. या 53 औषधांमध्ये मधुमेह रक्तदाब, जीवनसत्व ड-3 सप्लिमेंट्स, शरीराला कॅलशियमचा पुरवठा करणारी औषधे अशा अनेक औषधांचा समावेश असल्याचे दिसून येते.

Advertisement

याशिवाय मन शांत ठेवणारे क्लोनाजेपाम, यातना निवारक डिक्लोफेनेक, श्वसनाच्या रोगांवर उपयोगात आणले जाणारे एंब्रॉक्सोल, बुरशीविरोधी फ्लुकोनाझोल हे अँटिफंगल औषध, तसेच काही बहुजीवनसत्व आणि कॅलशियम गोळ्यांचाही औषधांच्या सूचीत समावेश आहे. नव्या आंतरराष्ट्रीय निकषांच्या अनुसार ही औषधे अयशस्वी ठरल्याचे केंद्र सरकारने बुधवारी स्पष्ट केले.

मोठ्या कंपन्यांची उत्पादने

या अयशस्वी ठरलेल्या औषधांची निर्मिती देशातील मोठ्या आणि ख्यातीप्राप्त कंपन्यांकडून होत आहे. हेटेरो ड्रग्ज, अल्फेम लॅबोरॅटरीज, हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेड, कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मासुटीकल्स लिमिटेड आदी नावांचा या कंपन्यांच्या सूचीत समावेश आहे, अशीही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.

सीएसडीएसओकडून चाचणी

या 53 औषधांचे परीक्षण सीएसडीएसओ या केंद्र सरकारच्या संस्थेने केले आहे. पोटात झालेल्या जंतुसंसर्गावर दिले जाणारे मेट्रोनिडाझोल हे औषधही अयशस्वी ठरले आहे. या औषधाची निर्मिती हिंदुस्थान अँटिबायोटिक्सकडून केली जाते. हे लोकप्रिय औषध आहे. त्याचप्रमाणे टॉरेंट फार्मास्युटिकल्स कंपनीचे  शेलकाल हे औषधही नापास झाले आहे. या 53 औषधांच्या सूचीत पाच बनावट औषधांचाही समावेश होता. या पाच औषधांचे उत्तरदायित्व स्वीकारण्यास कोणतीही कंपनी तयार झालेली नाही. ही औषधे अशीच बाजारात विकली जात होती.

ऑगस्टमध्येही बंदी

याच वर्षीच्या ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने 156 फिक्स्ड डोस काँबिनेशन औषधांवर बंदी घातली होती. या बंदी घातलेल्या औषधांमध्ये ताप, सर्दी, खोकला आणि इतर सर्वसामान्य रोगांवरील औषधे होती. तसेच जीवनसत्व सप्लिमेंट्स, वेदनाशामक औषधे, जंतुविरोधी औषधे यांचा प्रामुख्याने समावेश होता. ही औषधे घेतल्यास माणसाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून या औषधांचे उत्पादन, विक्री आणि प्रिस्क्रिप्शन यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.

नव्या सूचीतील औषधांचे काय?

केंद्र सरकारने बुधवारी प्रसिद्ध पेलेल्या अयशस्वी औषधांच्या सूचीतील औषधांचे काय होणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या औषधांवरही बंदी आणली जाणार आहे काय, हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. केंद्र सरकारकडून अद्याप तशी स्पष्ट घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, गुणवत्ता परीक्षणात अयशस्वी होणे याचा अर्थ या औषधांवरही बंदी येण्याची शक्यता आहे. यासंबंधी लवकरच नवा आदेश केंद्र सरकारकडून काढला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कदाचित कंपन्यांना या औषधांमध्ये सुधारणा करण्याची संधी दिली जाऊ शकते. यासंबंधीचे चित्र येत्या एका आठवडाभरात स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :

.