महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी आणखी दोघांना अटक

06:39 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्याध्यापकाचाही समावेश : हजारीबागमध्ये सीबीआयची कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी सीबीआयकडून कारवाई आणि तपासाचे सत्र जोरात सुरू आहे. याचदरम्यान शुक्रवारी हजारीबाग येथील ओएसिस स्कूलचे प्राचार्य डॉ एहसान-उल-हक आणि केंद्र अधीक्षक इम्तियाज यांना सीबीआयने अटक केली. डॉ. एहसान हे ‘नीट’ परीक्षेचे हजारीबागचे जिल्हा समन्वयकही होते. सीबीआयचे पथक गुऊवारी चौकशीसाठी हजारीबाग येथील चर्ही गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले होते. यादरम्यान सीबीआयच्या पथकाने गेस्ट हाऊसमध्ये प्रथम एहसान-उल-हक यांची चौकशी केली. गेल्या चार दिवसांपासून हजारीबागमधील ‘नीट’ प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाची सीबीआय टीम चौकशी करत आहे. बुधवारी ओएसिस स्कूलमध्ये तपास केल्यानंतर सीबीआयच्या पथकाने प्राचार्य एहसान उल हक यांना ताब्यात घेतले होते.

‘नीट’ पेपर लीक प्रकरणाच्या तपासादरम्यान बिहार पोलिसांना अटक केलेल्या उमेदवारांच्या घरातून अर्धे जळालेले पेपर सापडले होते. त्यात प्रश्नपत्रिकेच्या फोटोकॉपीही होत्या. यासंबंधी तपास केला असता बिहारच्या आर्थिक गुन्हे युनिटने दिलेल्या अहवालानुसार जळालेल्या प्रश्नपत्रिका मूळ प्रŽपत्रिकेशी एकरूप असल्याचे आढळले. अधिक तपासात पोलिसांना सापडलेल्या प्रश्नपत्रिका हजारीबाग येथील ओएसिस स्कूलच्या पुस्तिकेशी जुळत असल्याचे समोर आले. तेव्हापासून सीबीआयचे पथक ओएसिस स्कूलवर नजर ठेऊन होते.

या प्रकरणाबाबत प्राचार्य एहसान उल हक यांनी यासंबंधी स्पष्टीकरण देताना स्वत:ला निर्दोष घोषित केले होते. परंतु ‘ईओयू’च्या सूत्रांनुसार त्यांची भूमिका संशयास्पद आहे. ओएसिस स्कूलचे प्राचार्य एहसान उल हक हे सीबीएसईचे शहर समन्वयक देखील आहेत. हजारीबाग, चतरा, कोडरमा आणि रामगढ या चार जिल्ह्यांमध्ये त्यांची केंद्रे आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article