For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आंधळीत दोन जणांचा खून, कारण मात्र गुलदस्त्यात, शस्त्रासह अज्ञात आरोपी फरार

01:45 PM Oct 08, 2023 IST | Kalyani Amanagi
आंधळीत दोन जणांचा खून  कारण मात्र गुलदस्त्यात  शस्त्रासह अज्ञात आरोपी फरार

दहिवडी प्रतिनिधी

Advertisement

आंधळी ता.माण येथील पवारदरा या ठिकाणी मध्यरात्री पती पत्नी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खुनाचे कारण अद्याप समजले नसून शस्त्र घेऊन अज्ञात आरोपी फरार झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संजय रामचंद्र पवार (वय-५०वर्षे) व मनीषा संजय पवार (वय -४५ वर्षे) हे दोघे रात्री दहा नंतर पवारदरा येथील शेतात गेले होते. यावेळी पाईप जोडत असताना रात्री अचानक अज्ञाताने त्यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये डोक्यात आणि मानेवर बसलेला जबरी घावामुळे ते जागीच गतप्राण झाले. सकाळी ०९:३० वाजता पोलिसांना घटनेची माहिती कळल्यानंतर दहिवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पंचनामा केला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.