Satara News : अंगणवाडीतील बालकेही म्हणतात, आर्मी ऑफिसर होणार !
खटाव तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम
वडूज : खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील अंगणवाडी बालकांशी येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातील विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी मुक्त संवाद साधला ! तेव्हा बालकांच्या प्रतिसादाने सारेच अचंबित झाले.
तुम्ही मोठे झाल्यावर काय होणार? या प्रश्नावर ही बालके चक्क उत्तरली, मी डॉक्टर होणार !मी इंजिनियर होणार आणि एक बालक तर म्हणाले, 'मी आर्मी ऑ फिसर होणार !' केवळ तीन ते सहा वयोगटातील या बालकांची ही समज चकित करून गेली.
खटाव तालुक्यातील ४६४ अंगणवाड्यांमध्ये वेगवेगळे उपक्रम यशस्वीरित्या राबविले जात आहेत.अंगणवाड्यांना विविध सुविधा प्रदान केल्या जात आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यालयाचे सहकार्य आणि बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता खाबडे आणि वर्षाराणी ओमासे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.